परभणी (Parbhani):- धकाधकीच्या जीवनात छोट्या – मोठ्या कारणातून राग येत आहे. रागाच्याभरात समजुतदार व्यक्ती घर सोडून बेपत्ता होत आहेत. १ जून ते २६ जुलै या दरम्यान जिल्ह्यातून ८४ जण बेपत्ता (missing) झाले. यापैकी नेमके किती जण परत मिळाले, हे मात्र समजू शकले नाही. बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
बेपत्ता होणार्यांमध्ये १८ ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश
बेपत्ता होणार्यांमध्ये १८ ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक व्यक्ती हे २० ते ४० या गटातील आहेत. तरुण वयात राग (anger) सहन न झाल्याने घर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. तर काही वयोवृध्द नागरीक (Senior citizens) देखील घरच्या मंडळींना कंटाळून बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी गंगाखेड पोलीसात ११, कोतवाली, सेलू, सोनपेठ या पोलीस ठाण्यात प्रत्येकी ८, पाथरी ७, नवा मोंढा ६, मानवत आणि चारठाणा प्रत्येकी ५, पालम, बोरी प्रत्येकी ४, परभणी ग्रामीण, पूर्णा, नानलपेठ प्रत्येकी ३, जिंतूर, बामणी प्रत्येकी २ आणि पूर्णा, दैठणा, चुडावा, पिंपळदरी, ताडकळस या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका बेपत्ताची नोंद झालेली आहे.