रिसोड (Washim) :- महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान येथे भिम अनुयायांसाठी विशेष सेवा देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन रिसोड तालुक्यातील चिचांबाभर या गावी स्थापन झालेल्या शाक्यसम्राट मागासवर्गीय शैक्षणिक संस्थेचा अध्यक्षा सौ. अनिता जनार्धन वाकळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय कामगार असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष राजदीप जनार्धन वाकळे यांनी केले होते.
मोफत बिस्किटे, चिवडा, फळे, पेन व वह्या तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वितरण
महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान येथे हजारोभिम अनुयायांना मोफत बिस्किटे, चिवडा, फळे, पेन व वह्या तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. लाखो लोक भारताचा कानाकोपऱ्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर येथे येत असतात संस्थेने केलेल्या या सामाजिक कार्यामुळे अनुयायांना मोठा दिलासा मिळाला. ह्या वरील दोन्हीही संस्था 2015 पासून प्रत्येक वर्षी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दीन तसेच सम्राट अशोका विजयादशमी निमित्त दीक्षाभूमी नागपूर (Dikshabhumi nagpur) येथे आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर मुंबई येथे असे सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते असल्या उपक्रमासाठी नेहमी अग्रेसर
संस्थेचे अध्यक्ष राजदीप जनार्धन वाकळे यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते असल्या उपक्रमासाठी नेहमी अग्रेसर असतात. अशा उपक्रमासाठी त्यांना त्यांचे वडील जनार्धन नामदेव वाकळे हे नेहमी मार्गदर्शन करत असतात. “समाजाचे देणे लागते” या तत्त्वानुसार ते चालत असतात या लोकाभिमुखउपक्रमाच्या यशस्वितेसाठी उपस्थित अनुयायांनी आयोजकांची प्रशंसा केली आणि त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल आभार मानले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने अनुयायांच्या मनामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे.
“ही सेवा सामाजिक सलोखा वाढवण्याचा संदेश देते,” असे मत अनेकांनी व्यक्त केले…सदरील उपक्रमासाठी प्रदीप जाधव, आशा जाधव, माया जाधव उपस्थित होत्या..