नागपूर (White Eyed Buzzard) : अंबिका नगर परिसरातील सच्चिदानंद उद्यानामध्ये जखमी अवस्थेत आढळलेला’ (White Eyed Buzzard) व्हाईट आईड बझार्ड ‘या माणसासारखे पांढरे डोळे असलेल्या अनोख्या पक्षाला (Anil Dhamode) पक्षी प्रेमी प्रा. अनिल धामोडे यांनी (Rescue team) रेस्क्यू टीमच्या साह्याने जीवनदान दिले आहे. काल 16 मे रोजी दुपारी नागपूर येथे वादळीवाऱ्यांसह पाऊस कोसळला होता. दरम्यान सायंकाळी उद्यानामध्ये फिरण्यासाठी गेलेले प्रा. धामोडे यांना (White Eyed Buzzard) व्हाईट आयड बझार्ड ( वैज्ञानिक नाव – बुटास्तूर टीसा ) पक्षी जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. पक्षाच्या पंखाला इजा पोहोचली असल्याने त्याला उडता येत नव्हते.
पक्षीप्रेमी प्रा. अनिल धामोडे सह रेस्क्यू टीमचा पुढाकार
याबाबतची माहिती प्रा. धामोडे (Anil Dhamode) यांनी तात्काळ ग्रीन प्लॅनेट या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करताच सातारा वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील टीटीसी कुंदन हाते यांच्याशी संपर्क साधण्यात आला. हाटे यांनी तात्काळ सेमिनरी हिल्स येथील रेस्क्यू सेंटर मधील वनरक्षक डी. आर. आंधळे व स्वप्नील भुरे यांना उद्यानात पाठविले. अखेर महतप्रयासाने या पक्षाला पिजऱ्यात टाकून रेस्क्यू सेंटर मध्ये नेऊन जीवनदान देण्यात आले. (White Eyed Buzzard) व्हाईट आयड बझार्ड या पक्षाला सिंजरा तिसा किंवा श्वेतनेत्र गरुड असे देखील म्हणतात.




