दर अभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
मानोरा (Cotton Price) : दिवसेंदिवस सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून येत असुन काही वर्षांपूर्वी एक तोळा सोने अन् एक क्विंटल कापसाचे भाव समान होते. आता मात्र ती तफावत दहा पटीने असल्याचे दिसून येत आहे.
गत १० ते १५ वर्षांपासून (Cotton Price) कापसाचे भाव स्थिर असुन दूसरीकडे खत, बी बियाणे, कीटक नाशक, मजुरीचे दर व लागवड खर्चात भरामसाठ वाढ झालेली आहे. त्यामुळे उत्पन्न अन् लावगडीचा खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात शिल्लक काहीच पडत नसल्याने शेतकरी राजा आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. सोने खरेदी करणे आता सर्वसमान्याच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने श्रीमंत वर्गातून सोने खरेदीला पसंती मिळत आहे. दूसरीकडे पांढरे सोने लागवड खर्च जास्त अन् उत्पन्न कमी यामुळे काळवंटले आहे. त्यातच निसर्गाची अवकृपा, मजुरांची कमतरता यापायी शेतकरी मेटाकुटीत सापडला आहे.
कापसाला (Cotton Price) कवडीमोल भाव मिळत असल्याने कापुस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला असुन आम्हाला अनुदान नको, आमच्या शेतमालाला हमी भाव द्यावा, अन्यथा आत्महत्या शिवाय पर्याय नाही, असे शेतकरी ओरडत आहे.