स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण व कन्हान पोलीसांची कारवाई
कन्हान (Kanhan murder Case) : सदभावना नगर कांद्री-कन्हान येथील रहि वासी महेंद्र बर्वे यांची अज्ञात आरोपीनी रात्रीला पानता वने कॉलेज जवळील हरडे लेआऊटच्या जागेत चाकुने मारून व दगडाने ठेचुन निर्दयी हत्या करण्या-या आरोपीना (Kanhan murder Case) स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण व कन्हान पोलीसांनी शोधुन तुषार गुरधे व तीन विधीसंघर्ष बालक असे चार आरोपीताना १२ तासात पकडुन पोलीस पुढील सखोल तपास करित आहे.
रविवार (दि.२३) मार्च २०२५ चे रात्री ११:३० वाजता महेंद्र बर्वे हा जेवण झाल्यावर फोनवर बोलत घराचे बाहेर फिरत होता. मृतक रात्रभर घरी परत न आल्याने सकाळी मृतकाचा मोठा भाऊ व पत्नी दोघे ही मृतकाचा शोध घेत असतांना मृतकच्या पत्नीला फोन आला की, मृतक महेंद्र टिकाराम बर्वे याचे मृतदेह हरडे लेआउट येथे पडले असुन त्याला कोणीतरी अज्ञा त आरोपीने (Kanhan murder Case) धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी सोमवार (दि.२४) मार्च ला फिर्यादी जितेंद्र टिकाराम बर्वे वय ३२ वर्षे, सद्भावना नगर, पानतावने कॉलेजजवळ कांद्री कन्हान यांचे तक्रारी वरून पोस्टे कन्हान येथे अज्ञात आरोपी विरू द्ध कलम १०३(१) भा.न्या.सं २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून मा. हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदशनात कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोनि ओमप्रकाश कोकाटे यांनी आप ल्या पोलीस कर्मचा-या सह तात्काळ अज्ञात आरोपी चा शोध सुरू केला.
गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पध्दतीने तपास करत (Kanhan murder Case) स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांनी अवघ्या १२ तासात आरोपीतांचा शोध लावुन आरोपी तुषार राजेश गुरधे वय २३ वर्षे, रा. पिंपरी कन्हान याला ताब्यात घेऊन विचारपुस करून त्याचे सह तीन विधीसंघर्ष बालकांनी मिळुन पैशांच्या वादातुन मृतकाची हत्या केल्याचे सामेर आल्याने आरो पीताना अटक करण्यात आली.
महेंद्र टिकाराम बर्वे वय ३० वर्षे, हा सद्भावना नगर, पानतावने कॉलेजजवळ वार्ड क्र ६, कांद्री कन्हा न येथे आ़ई वडिल, पत्नी, एक वर्षाची मुलगी व मोठा भावाचा परिवार मिळुन राहत असुन हा नगरपंचायत कांद्री पंप हॉऊस कंत्राटी कर्मचारी असुन लोकांना व्याजाने पैसे दयाचा. पैश्याच्या देणे घेण्याच्या कारणा वरून या चार आरोपीनी पैश्याच्या वादात भांडणात त्याचे चेह-यावर (Kanhan murder Case) धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने तो रक्तबंबाळ खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर मोठया दगडाने मारून ठेचुन त्याची निर्दयी हत्या केल्याचे पोलीसाच्या प्राथमिक तपासात सामोर आले आहे.