आपघात, वादविवादाची शक्यता, न.प. ने लक्ष देण्याची मागणी
रिसोड (Illegal Banner) : रिसोड शहरातील मालेगाव नाका ते वाशीम नाक्या पर्यंतचा रस्ता या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतो.गेली कित्येक वर्षा पासुन सदर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असुन अद्यापही या रस्त्याचे काम सुरू आहे. तर अनेक ठिकाणी विद्युतपोल आपघाताचे कारण ठरले आहे.मात्र आता हल्ली रिसोड शहरातील नागरिकांना एक वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर विविध प्रकारच्या पाट्या,नेते,पुढा-यांचे शुभेच्छा (Illegal Banner) बॅनर त्रासदायक ठरत आहेत. या दुभाजकावर लावलेल्या पाट्या-बॅनरमुळे आपघातासह वाद विवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वेळीच नगरपरिषद ने हस्तक्षेप करून सदर पाट्या-बॅनर हटविण्यात यावे आशा प्रकारची मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे.
रिसोड शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुभाजकावर दुकान,दवाखाने, कार्यालय,चौक,नगर,गल्ली, कॉलनी,वाढदिवसा सह अनेक प्रकारच्या विभिन्न पध्दतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. सदर पाट्या-बॅनर (Illegal Banner) लावण्यासाठी संबंधित व्यक्तीने नगरपरिषद चा परवाना घेतला आहे का ? नाही याबाबतही प्रश्न निर्माण केला जात आहे ? सदर पाट्या-बॅनर अत्यंत जवळजवळ असुन जणु काही पाट्या-बॅनर लावण्याची स्पर्धा लागली की काय आशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ता ओलांडताना या (Illegal Banner) पाट्या-बॅनरमुळे दुसऱ्या रस्त्यावरील वाहन किंवा अन्य कोणती वस्तु दिसत नाही. यामुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.सदर रस्त्यावर लावण्यात आलेल्या काही पाट्यामुळे वादविवादही होण्याची शक्यता नागरिकांकडुन व्यक्त केली जात आहे. सदर रस्त्यावर नगरपरिषद ने झाडे लाउन सौंदर्यीकरण करावे. कारण या रस्त्यावर लावण्यात आलेल्या पाट्यामुळे रस्ता व दुभाजक अत्यंत अशोभनीय दिसत आहे. आशा प्रकारची चर्चा नागरिकां मध्ये वर्तवली जात आहे. यामुळे नगरपरिषद ने ध्यान देऊन या दुभाजकावर झाडे लावुन याचे सौंदर्यीकरण करावे अशी मागणी केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग बनला राजकीय नेत्यांच्या ताटा खालचे मांजर
रिसोड शहरातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. सा.बां.विभागाच्या हद्दीमध्ये अनेक नेत्यांच्या वाढदिवस, निवडीच्या शुभेच्छांचे बॅनर कुठल्याही परवानगीविना लावण्यात आलेले आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मुग गिळुन गप्पा का? आहे, हे सर्वसामान्यांच्या आकलना पलीकडचे आहे. (विनापरवाना होल्डिंग, (Illegal Banner) बॅनर वर कारवाई करण्यात येईल मुख्याधिकारी मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार अवैध होल्डिंग तपासणीवर समिती नेमली आहे शहरात विनापरवाना होल्डिंग , बॅनर लागल्यास तात्काळ काढून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-मुख्याधिकारी सतीश शेवदा