दोन ट्रॅक्टर केनीसह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
दोघांविरुध्द गंगाखेड ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल…!
परभणी/गंगाखेड (Illegal sand mining) : गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर केनीसह पकडून एकुण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरुध्द (Illegal sand mining) वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही गंगाखेड पोलिसांनी मंगळवार रोजीच्या पहाटे धारखेड शिवारात केली आहे.
पहाटे परभणीच्या धारखेड शिवारात केली कारवाई…!
शासनाचा महसुल बुडवून तालुक्यातील धारखेड शिवारात गोदावरी नदी पात्रातून ट्रॅक्टरला केनी लावून त्या आधारे (Illegal sand mining) वाळूचे अवैधरित्या उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत वाळू चोरी सुरु असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे, पो.ह. संभाजी शिंदे, पो.शि. गजेंद्र चव्हाण, हनुमान पौळ, धनंजय कनके, अनंत डोंगरे आदींच्या पथकाने मंगळवार २५ मार्च रोजीच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या धारखेड शिवारातील गोदावरी नदी पात्रात छापा मारून पासिंग क्रमांक नसलेला एक महींद्रा ५९५ DI Turbo कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर हेड त्यासोबत लोखंडी केनी यंञ किंमत अंदाजे ३ लाख रुपये, एक महींद्रा ५९५ DI Turbo कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर हेड त्यासोबत लोखंडी केनी यंञ किंमत अंदाजे ३ लाख रुपये असा एकुण अंदाजे ६ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून सय्यद सलमान रा. धारखेड, मोहम्मद अजू मो. नूर रा. महसुल कॉलनी गंगाखेड यांच्यासह इतरांविरूध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात (Illegal sand mining) वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि राम गिते हे करीत आहे.