यवतमाळ(Yawatmal) :- शहरातील दत्त चौक परिसर गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या काही दिवसात चर्चेत आला आहे. चाकू हल्ला, त्यानंतर सायंकाळी घडलेले हत्याकांड (massacre) याचा तपास पूर्ण होत नाही तोच सोमवारी सायंकाळी चक्क पत्नीने नवऱ्याच्या प्रेयसीवर चाकूहल्ला (knife attack) करून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाने पोलिसांनाही धक्का बसला आहे.
रागात थेट धारदार चाकूने नवऱ्याच्या प्रेयसीवर वार
मोठे वडगाव परिसरात राहणाऱ्या आकाश (३२) याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध (relation) आहेत, असा संशय त्याच्या पत्नीला होता. ती आकाशच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. सोमवारी नेमका आकाश प्रेयसीसोबत दत्त चौक परिसरात आढळला. यामुळे तिच्या रागाचा पारा चढला. तिने थेट धारदार चाकूने नवऱ्याच्या प्रेयसीवर वार(blow) केले. यात ती गंभीर जखमी झाली. हा प्रकार अवधूतवाडी पोलिस ठाण्यात पोहोचला. आतापर्यंत शरीर दुखापतीतील आरोपी पुरुष होते. पहिल्यांदाच महिलेला आरोपी करण्याची वेळ पोलिसांवर आली. शहराच्या मध्यवस्तीत असलेला दत्त चौकही आता गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत आला आहे. येथे गर्दीत चोरीचे गुन्हे घडत होते, आता शरीर दुखापतीच्याही घटना होत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील गुन्हे- गारीबाबत चिंता व्यक्त होत आहे. एकूणच याबाबत आता विचारमंथनाची वेळ आली आहे