Gondia:- अर्जुनी मोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा ईसापुर (इटखेडा) येथील मेक्षाम कुंडलिक भावे वय 42 यांचा त्यांची पत्नी वैशाली मेक्षाम भावे वय 38 दिनांक 11/06/2024 ला रात्रौ १०:०० वाजता जेवण आटपून पती-पत्नी झोपी गेले.
पत्नी व तिच्या बहिणीची मुलगी या दोघां मिळून मेक्षामयांचा गळा दाबून हत्या
पती झोपेत असता त्यांची पत्नी वैशाली व तिच्या बहिणीची मुलगी या दोघां मिळून मेक्षामयांच्या गळा दाबून जीव घेतला. दिनांक 12 जून 2024 ला सकाळी ७:०० वाजता दूध काढण्यासाठी वडिलांनी मुलाच्या पायाला स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न केला असता मुलाचा शरीर त्यांच्या हाताला थंड लागल्याने मुलगा मरण पावल्याची(died) निर्देशनास आले. मुलाचा आकस्मित मृत्यू
(Sudden death) झाला समजून त्याची अंत्यविधी करिता तयारी करण्यात आली. संपूर्ण नातेवाईक आल्यानंतर दुपारी १:०० अंत्यविधी करिता त्यांची आंघोळ करण्यात आली, त्यावेळी त्यांच्या गळ्यावरती गळफासची रक्त दिसून आले.
अर्जुनी मोर पोलीस स्टेशनला तक्रार नोंद
आई वडील व नातेवाईकांच्या लक्षात आले की मेक्षामची हत्या (Murder)करण्यात आली. याची दखल घेऊन अर्जुनी मोर येथे शवविच्छेदना(Autopsy) करिता आणले व अर्जुनी मोर पोलीस स्टेशनला तक्रार(complaint) नोंद केली तपासात युवकांचा मृत्यू नसून खून असल्याचे लक्षात येतात. अर्जुनी मोर्ं चे ठाणेदार विजयानंद पाटील बीट अंमलदार डोंगरवार सहकारी यांच्यासह वैशाली भावे व तिची बहिणीची मुलगी यांना पोलीस ठाण्यात आनलेत्यांची जबान बोलती करण्यात आली. या प्रकरणात अनेक मासे अडकण्याची शक्यता आहे. इतरत्र आरोपीचा सुद्धा शोध घेणे सुरू होते.