परभणी (Parbhani):- पती – पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने पतीचा मोबाईल (Mobile)फोडला. याच रागात पतीने दोरीने गळा अवळून पत्नीला मारले. ही घटना सोनपेठ तालुक्यातील थडीउक्कडगाव येथे १ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी २ जुलैला सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राग आल्याने दोरीने गळा आवळून पत्नीचा खून
शिवराम भंडारे यांनी तक्रार(Complaint) दिली आहे. फिर्यादीच्या शेतावर सालगडी म्हणून रामु शुक्ला बामणे, त्याची पत्नी कृष्णा रामु बामणे रा. खेरकुंडी ता. भगवानपुरा जि. खरगुन (मध्यप्रदेश) हे दोघे कामाला आहेत. २ जुलै रोजी पहाटे सालगडी रामु बामणे याचा साडु करण बामणे याने फिर्यादीला फोन करुन रामु बामणे याची पत्नी कृष्णा बामणे मरण पावली आहे, असे सांगितले. फिर्यादीने आखाड्यावर जावून पाहणी केली. त्यानंतर मयताच्या पतीला विचारणा केली. त्याने कालरात्री माझ्या मोबाईलवर अनोळखी मुलीचा फोन आला होता. यावरुन आमच्यात वाद झाला. या वादात पत्नीने मोबाईल जमीनवर आपटून फोडला. याचा राग (anger) आल्याने दोरीने गळा आवळून पत्नीला मारल्याचे सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह(dead body) ताब्यात घेतला.