अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या निमगाव-बोंडगाव/देवी मार्गावरील घटना
अर्जुनी/मोरगाव (Wild animal) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8:45 वाजता घडली .अर्जुनी/मोरगाव वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या निमगाव- बोंडगाव/देवी मार्गावरील निमगाव च्या जवळील घटना उघडकीस आली.याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आज 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8:45 वाजता निमगाव येथे (Wild animal) वन्य प्राणी अस्वल ही रस्त्याच्या कडेला पडून असल्याची माहिती निमगाव येथील नागरिकांनी वन विभागाला भ्रमणध्वनी द्वारे दिली.
माहिती मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. (Wild animal) घटनास्थळाची पाहणी केली असता निमगाव ते बोंडगाव/देवी दरम्यान अर्जुनी ते साकोली रस्त्याने अगदी निमगाव जवळ एक वन्यप्राणी अस्वल मादी मृतावस्थेत होती. अधिक तपास केले असता सदर वन्यप्राणी अस्वलाचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेने सकाळच्या चार ते पाच वाजेच्या दरम्यान झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
घटनास्थळी संपूर्ण चौकशी करून मृतवन्यप्राणी अस्वलाचे शवविच्छेदन प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी सदाशीव अवगान यांचे समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी महागाव डॉ. समीर शेंद्रे यांनी पूर्ण केले. (Wild animal) वन्य प्राणी अस्वल यांचे वय अंदाजे पाच वर्ष इतके असावे. शवविच्छेदनानंतर अस्वलाचे मृतदेह वन आगार अर्जुनी/मोरगाव येथे दहन करण्यात आले. याबाबत संपूर्ण कारवाई गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक तपास वनपरिक्षेत्राधिकारी सचिन कटरे,वनरक्षक चोले व वन अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.