बारव्हा (Bhandara) :- हाताशी आलेल्या उन्हाळी धानात वन्य प्राण्यांचा धुडगूस वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव परिसरातील चिचोली शेतशिवारात रानगव्यांचा कळपाची ‘एन्ट्री’ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर(Social media) व्हायरल झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
दांडेगाव शेतशिवारात रानगव्यांची ‘एन्ट्री’
यावर्षी लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली आहे. त्यात दांडेगाव, दहेगाव, चिचोली, बारव्हा परिसरात कापणीला आलेल्या धानाची कापणी व मळणी धडाक्यात सुरू आहे. दि.१९ मे रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान चिचोली शेतशिवारात उन्हाळी धान लागवड केलेल्या परिसरातून जवळपास ६ रानगव्यांचा कळप पळताना व्हिडिओ रस्त्याने जाणार्यांनी आपल्या मोबाईलमध्ये (mobile)कैद केला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. हाताशी आलेल्या धान पिकात आता रानगव्यांची एन्ट्री झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे निसर्गाच्या संकटाने होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता रानगव्यांचा शेतशिवारात प्रवेश झाल्याने पुन्हा शेतकरी (Farmer)चिंताग्रस्त होऊन वन्य प्राण्यांच्या तावडीतून पीक वाचविण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पीक वाचविण्याची धडपड करीत आहे. वन विभागाने(Forest Department) वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात असून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता वनविभागाच्या उपाययोजना केवळ नाममात्र ठरत असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप(anger) व्यक्त केला जात आहे.