चिखली (Buldhana) :- तालुक्यांतील अंत्री कोळी गावामध्ये गेल्या काही दिवसा पासून एका जंगली वानराने गावात मोठी दहशत पसरवली आहे. त्यामध्ये दररोज वानर हे जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) प्रवेशद्वारच्या भिंतीवर जावून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकावर हल्ला करत आहे त्यामुळे गावकऱ्यासह विद्यार्थांचा जीव धोक्यात आला आहे.
२० दिवसापासून जंगली वानरांचा घरा घरावर जावून धुमाकूळ
चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथील जिल्हा परिषद शाळा परिसर, तसेच गावा मध्ये गेल्या २० दिवसापासून जंगली वानर घरा घरावर जावून धुमाकूळ घालत आहे. त्यास हाकलुन लावण्याचा प्रयत्न केला असता वानर (Monkeys)धावत येवून महिला व लहान मुलांना चावा घेत आहे. गावातच जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेच्या प्रवेशद्वार वरील भिंतीवर जावून मुले मुली व शिक्षक शाळेत येताच त्यांच्या अंगावर धावत जावून त्यांच्या हातातील पुस्तके, बॅग हिसकावून नासधूस करत आहे . काही वेळा तर मुलावर हल्ला सुध्दा केला गेला आहे या बाबतीत स्थानिक ग्रा. प. प्रशासनाने लवकरात लवकर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देवून धुमाकुळ घातलेल्या जंगली वानरराचा बंदोबस्त करावा अशी मागणी महेंद्र हिवाळे तथा गावकरी करत आहे.