सडक अर्जुनी (Wildlife) : वनांच्या प्रमाणात घट आणि पर्यावरणाचा अमतोल वाढत आहे. यामुळे (Wildlife) वन्यजीवांचा अधिवासाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर उपाययोजना म्हणून शासनाकडून कोट्यवधीचा निधी खर्च केला जात आहे. परंतु, अधिकार्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शासनाच्या निधीचा चुराडा होत आहे. असा प्रकार (Chichgarh Forest Zone) चिचगड वनपरिक्षेत्रात दिसून येत आहे. वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारे वर्षभरात गायब झाले आहेत. यामुळे वन्यजीवांची तहान कशी भागणार? असा प्रश्न वन्यप्रेमींनी उपस्थित केला आहे.
वन्यजीवांची तहान भागेना, निधीचा चुराडा
वनांचे घटते प्रमाण आणि पर्यावरणाचा र्हास वन्यजीवांच्या मुळावर उठला आहे. जंगलात चारा, पाणी मिळत नसल्याने (Wildlife) वन्यजीव गावाकडे धाव घेतात. यातून मानव-प्राणी संघर्षाच्या अनेक घटना घडत आहेत. तर गावाच्या दिशेने धाव घेणार्या मुक्या जीवांना प्राणासही मुकावे लागत आहे. या प्रकाराने जंगलातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आले आहे. अनेक वन्यजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या (Forest Department) वन विभागाच्या वतीने जंगलातच वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय व्हावी, पर्यावरणाचा समतोल राखला जावा, भु-गर्भातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, या उद्देशाने कोट्यावधीचे रूपये खर्च केला जातो. पण अधिकार्यांच्या नियोजन शून्यतेमुळे शासनाचा पैसा वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.
अधिकारी-कंत्राटदाराची मिलीभगत
चिचगड वनपरिक्षेत्रातील (Chichgarh Forest Zone) पिपरखारी गावाजवळ दोन तर घोगरा गावा जवळील नाल्यावर प्रत्येकी अंदाजे दहा लाख रुपये खर्च करून सन २०२३ मध्ये बंधारे बांधण्यात आले आहेत. लाखो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेले जंगलात बांधण्यात आलेले बंधारे अंत्यत निकृष्ट दर्जाचे असून थेंबभर पाणी साचून राहत नाही. त्यामुळे या बंधार्याचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बंधार्याचे बांधकाम निकृष्ट व नियोजन शुन्यतेमुळे तिन्ही बंधारे ठिकठिकाणी फुटून भेगा गेल्याने त्या बंधार्याजवळ एक थेंबही पाणी साचून राहत नाही. त्यामुळे बंधारा बांधकामातून मलई लाटण्यातच कंत्राटदार व अधिकार्यांनी धन्यता मानली असावी? अशीही चर्चा वन्यप्रेमींमध्ये सुरू झाली आहे.
बंधार्यांचा दर्जा, गुणवत्ता तपासणार कोण?
महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या (Jalyukta Shivar Yojana) माध्यमातून कॅम्प योजनेअंतर्गत बंधार्यांची निर्मिती २०२३ मध्ये करण्यात आली आहे. यातंर्गत पिपरखारी गावाजवळ दोन व घोगरा गावाजवळील नाल्यावर एका बंधारा बांधण्यात आला. वर्षभरातच बंधारे वाहून गेले? त्यामुळे कामाचा दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिन्ही बंधारे बांधत असताना मालसुतो अभियान राबवून अधिकारी व कंत्राटदाराने कामाचा दर्जा व गुणवत्ता गहाण ठेवल्याची चर्चा जोमात सुरू आहे.
चौकशी करून कारवाई करा
वनविभागाच्या (Forest Department) वतीने (Wildlife) वन्यजीवांची भटकंती टाळून जंगलात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधीचा चुराडा केला जात आहे. पण अधिकारी कंत्राटदारांना हाताशी धरून शासन निधीची पुरती वाट लावत आहेत. असाच प्रकार (Forest Department) वनविभागातंर्गत येणार्या विविध कामांच्या गुणवत्तेवरून दिसून येत आहे. त्यामुळे विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी निष्पक्ष कामाची चौकशी करून भ्रष्टाचार्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.