देगाव (Wildlife) : परिसरातील पिंपळगाव (Pimpalgaon) येथील मायरूक शेतशिवारात बिबट्याचा (Leopard) वावर असल्याचा व्हिडीओच रविवारी रात्री ११.३० वाजता काढला. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीती पसरली असून, ते (Shetshiwar) शेतात कामासाठी जाण्यास घाबरत असल्याचे दिसून येत आहे. येथील गजानन पातोडे यांच्या शेतात कामानिमित्त रविवारी रात्री माजी उपसरपंच अक्षय महानकार, विशाल महानकार, अनंता घोगरे हे गेले होते. यावेळी दूर अंतरावर अंधाराच्या काळोखात कशाची तरी चाहूल लागली. त्यांनी लागलीच सुरक्षित स्थळी सहारा घेत बॅटरीच्या उजेडात आवाजाच्या दिशेने पाहिले.
यावेळी एका ठिकाणी बिबट्या बसलेला दिसला. (Leopard) बिबट्याला पाहताच त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले. मात्र मोठ्या हिमतीने या शेतकर्यांनी एवढ्या अंधारात (Leopard) बिबट्याचा व्हिडीओ शूट केला आहे. याची माहिती गावात पसरताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे (Forest Department) वन विभागाने याची दखल घेऊन या (Wildlife) बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.