पुसद (Wildlife monkeys): यंदा तालुक्यात पावसाळ्यात समाधानकारक पाउस झाला नाही. रारासरीपेक्षा कमी पाउरा झाल्याने औडे, नदीनाले खळखळून वाहिले नसल्याचा फटका वन्यप्राण्याना बसु लागला. मे हिट मध्ये तालुक्यातील विविध शिवारातीलपाणवठे अखेर में महिन्यात कोरडेठाक पडल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी व जंगलात चारापाणी नसल्याने भटकंती करत नागरी वस्तीकडे येत आहेत.
वन्यप्राणी माकडे नागरी वस्तीमध्ये पाण्याच्या-अन्नाच्या शोधार्थ
अनेकदा रस्ता ओलांडून जाताना वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक बसून अपघात घडून येत आहेत. तालुक्यातील विविध ग्रामीण दुर्गम भागात माळरान, डोगराळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. विविध शिवारात वनविभागाच जंगल आहेत वनपरिक्षेत्रातील मोर, हरिण, रोही, रानडुक्कर, कोल्हे, तांडगे, ससे, सायाल, वानरे व इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. याचप्रमाणे विविध प्रजाती चे पशुपक्षी मोठ्या प्रमाणातलआहेत. जंगलात बहुतांश पाणवठे कोरडे दिसत आहे. पूस नदीपात्रात थोडेफार पाणी काही भागात आहे. कालव्यास पाणी सुटले तर ते काही दिवस राहते.
तरुणाने अन्नाचा घास भरविला
शेततळे बंधारे, पाझर तलाव, गाव तलाव यात यंदा पाहिजे तसा पाणीसाठा नाही डोगराळ, माळरानावर मार्च महिन्यात वन्यप्राणांसाठी जंगल परिसरात वन विभागामार्फत पानवटे तयार करण्यात आले आहेत. मेच्या हिट मध्ये पानवटे कोरडे पडले आहेत. पाण्याच्या व अन्नाच्या शोधात विशेष करून माकडे पुसद शहरात नागरी वस्तीमध्ये धाव घेत आहेत. असेच एक चित्र भाग्यनगर येथील एका निवासस्थानी काही माकडांचा कळप पाण्याच्या शोधार्थ आली असता निवासस्थानातील बालकांनी या माकडांना पाण्यासह अन्न. हातामध्ये दिले, हे विशेष.