जम्मू(Jammu):- जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरक्षा दल (security forces)आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद झाले आहेत. लष्कर(Army), सीआरपीएफ (CRPF)आणि पोलिसांचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत आहे. सुरक्षा दलांनी एक किंवा दोन दहशतवाद्यांना घेरले असावे. अंधाराचा आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि कडक बंदोबस्त ठेवला. कठुआ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांचे पथक जम्मू प्रदेशातील विविध भागात शोध मोहीम राबवत आहेत. या संदर्भात डोडाच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. यावेळी दहशतवाद्यांनी(Terrorists) गोळीबार केला. प्रत्युत्तराच्या कारवाईने चकमक सुरू झाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आठवडाभरातील ही चौथी चकमक
अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन (operation) ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे 7.45 वाजता देसा वनक्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमक सुरू झाली. जम्मू विभागाला दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. गेल्या 35 दिवसांत डोडा भागातील ही चौथी चकमक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोडा जंगलात दहशतवाद्यांचा एक गट लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यावर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसओजी) आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम राबवली आणि त्याचदरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये आठवडाभरातील ही चौथी चकमक आहे. या ऑपरेशनला ऑपरेशन कोठी असे नाव देण्यात आले आहे.
गोळीबारात सुरुवातीला एक अधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्यासह लष्कराचे चार जवान जखमी
20 मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या गोळीबारात सुरुवातीला एक अधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्यासह लष्कराचे चार जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराने सांगितले की, या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून शेवटचे वृत्त येईपर्यंत कारवाई सुरूच होती. अलीकडच्या काळात जम्मू भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. विशेषत: पूंछ, दोडा, राजौरी आणि रियासी सारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. दुसरीकडे, सुरक्षा दलांची दिशाभूल करण्यासाठी दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रेही आहेत.