कोरेगाव चोप (Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यातील बारा भाऊ बोळदा येथे शेजारील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अवैधरित्या विद्युत ताराचा उसाला कंपाऊंड करून विद्युत प्रवाह(electric current) सोडल्याने शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलगा आकाश दुर्वास गायकवाड वय 17 याचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3.45 वाजता घडली.
जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान
पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात 10 सप्टेंबरला जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते, त्यानंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिली व बळीराजा धान पिकाला पाण्याच्या धडपडीत लागला त्यातच महावितरण कडून अनियमित वीज पुरवठाही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. दिनांक 16 सप्टेंबरला देसाईगंज तालुक्यातील बारा भाव बोळदा या ठिकाणातील शेतकरी दूर्वास गायकवाड यांचे स्वतःच्या शेतात ध्यान पीक लावलेली आहे मृतक आकाश वय वर्षे 17 हा गोंदिया जिल्ह्यातील महागाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात 11 वित शिकत होता 16 सप्टेंबरला शाळेला सुट्टी असल्याने तो घरीच होता शेतातील धनाला पाणी देण्यासाठी आकाश व त्याचा चुलत भाऊ दोघेही शेताकडे गेले.
बोडदा गावात शोखकळा पसरली
आकाश शेतातला पाणी सोडून परतत असताना गुणाजी मंसाराम गायकवाड या शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकाला सभोवताल अवैद्यरित्या शिवधुऱ्यावर विद्युतरांचा कंपाउंड करून त्यावर विद्युत प्रवाह सोडला होता. आकाश परत येत असताना अचानक त्याचा स्पर्श जिवंत विद्युत तारेला झाल्याने आकाश तडफडला व तो मानेच्या बाजूने तारावर पडल्याने गळा व सभोवती जागा जळून जागीच मृत्यू (Death)झाला. भावाचा अचानक मृत्यू बघून चुलत भावाची भेंभेरी उडाली. इतरांनी घरच्यांना कळविले व देसाईगंज पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करून मृतदेह (dead body) शवविच्छेदनासाठी देसाईगंज येथिल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. आकाशा हा,आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने बोडदा गावात शोखकळा पसरली तर बेजबाबदार वागणाऱ्या व अवैद्यरित्या विद्युत कंपाऊंड करून प्रवाह देणाऱ्या शेतकरी गुणाची मन्साराम गायकवाड यांच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक पोलीस स्टेशनला धडकले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, मनोज ढोरे प्रदेश सरचिटणीस ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश शिवसैनिक व शेतकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू
गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी सांगितले. यावेळी हेमराज गायकवाड,अनिल गायकवाड,अशोक गायकवाड, कुसन गायकवाड,शालिक शेंद्रे व शेकडो शेतकरी उपस्थित होते. विशेषता शेजारील शेतकऱ्यांनी अनेक वेळा गुणाजी गायकवाड यांना विद्युत कंपाउंड करून नये असे अनेकदा सांगूनही काना डोळा करीत गुणाजीने तारेचा कंपाऊंड करून त्यावर अवैद्यरीत्या विज प्रवाह दिल्याने आकाशला आपला जीव गमवावालागला आकाशच्या मागे आई-वडील व मोठी बहीण आहे गावात आरोपी शेतकऱ्याविरुद्ध रोषनिर्माण झाला आहे तर देसाईगंज पोलिसांनी गुणाजी मंसाराम गायकवाड व मुलगा, उमाजी गुणाजी गायकवाड यांना अटक करून पुठील तपास पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस करीत आहेत. बहुतांशे लोक अवैद्यविज प्रवाहाने जंगली प्राण्यापासुन पिकांचे रक्षणासाठी विज प्रवाह वापरतात तर काही आबंट शौकीन जंगली प्राण्यांची शिकारी साठी असा अघोरी प्रयत्न करतात तरी संबधीत विभागाने अशा लोकांनवर कड़क कारवाही करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.