देशोन्नती वृत्तसंकलन
ईटान (Gharkul Yojana) : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या धूम धडाक्यात शासनाच्या विविध घरकुल योजनेचे लाभार्थी घरकुलाचे बांधकाम करीत आहेत. तर दुसरीकडे कुठलेही घरकुलाचे बांधकाम न करता शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून सरपंच सचिव यांच्या संगनमताने बिना घरकुलाचे बांधकाम करता प्रत्येक लेव्हलचे बनावट प्रमाणपत्र सादर करून बोगस (Gharkul Yojana) घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या निधीची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार (Lakhandur Panchayat Samiti) लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये सुरू आहे.
राज्यातील गरीब गरजू अती गरजू लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना, वसंतराव नाईक घरकुल योजना आणि सद्या नव्यानेच सुरू करण्यात आलेली मोदी आवास योजना यासारख्या घरकुल योजनांमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील त्या-त्या प्रवर्गातील पात्र गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांनाच घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र (Lakhandur Panchayat Samiti) लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायतीमध्ये चक्क घरकुलाचे आणि शेवट संपूर्ण घरकुलाचे बांधकाम न करता (Gharkul Yojana) घरकुल बांधकाम करीत असल्याचा बनाव करून सरपंच सचिव यांच्या कडून घरकुल बांधकामाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची निधी लाटण्याचे काम सुरू आहे.
कोणत्याही योजनेतील घरकुल मंजूर झाल्यानंतर सबंधित लाभार्थ्यांचा करारनामा होताच (Gharkul Yojana) घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात वीस हजार रुपयाचे धनादेश टाकल्या जाते. नंतर लाभार्थ्याला रीतसर घरकुलाचे बांधकाम पूर्ण करायचे असते त्यात लभार्थाने फोंडेशन लेव्हल, लिटल लेव्हल, स्लॅब लेव्हल
आणि शेवट संपूर्ण घरकुलाचे बांधकाम झाल्यानंतर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर (Gharkul Yojana) घरकुलाचे धनादेश पंचायत समिती स्तरावरून अदा केले जाते. हे धनादेश अदा करीत असताना ग्रामपंचायत सरपंच सचिवाने त्या त्या लेव्हल चे पूर्णत्वचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय आणि जिओ ट्यागिंग केल्या शिवाय धनादेश अदा केले जात नाही. मात्र लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायत मध्ये चक्क घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करता करारनामा करून शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून सरपंच सचिव यांच्या संगनमताने बिना घरकुलाचे बांधकाम करता प्रत्येक लेव्हलचे बनावट प्रमाणपत्र सादर करून बोगस घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या निधीची उचल केले आहे.
सबंध प्रकार करीत असताना किती लोकांचे हात लाला झाले याचे बिगूल लवकरच जनतेपुढे येणार आहे. (Lakhandur Panchayat Samiti) लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या बोगस घरकुलाची चौकशी नवनियुक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी करणार काय? या बोगस (Gharkul Yojana) घरकुल लाभार्थ्यांना बडावा देणाऱ्या सरपंच सचिवावर कठोर कार्यवाही करणार काय? याकडे यांच्या संगनमताने बिना घरकुलाचे तालुकावाशियांचे लक्ष लागले आहे.