चिखली (Buldhana) :- सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारा मार्फत मेरा बु ते अंढेरा रोडचे डाबरीकरणं करुण सात ते आठ नवीन पुलाचे बाधकाम केले होते.काम करतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतल्याने ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे करुण टाकले. त्यामुळे एका वर्षात रोडचे डाबरीकरण ठिकठिकाणी उखडून रस्त्याची चाळणी झाली आणि पुलाला मोठे भगदाड पडले त्यामुळे लहान मोठे अपघाताची (Accident) मालिका सुरु झाली आहे.
पुलाला मोठे भगदाड पडले त्यामुळे लहान मोठे अपघाताची मालिका सुरु
चिखली आणि दे राजा तालुक्यात येत असलेल्या मेरा बु ते अंढेरा रोड हा लोकांना लांब पल्याच्या शहराला जाण्या येण्यासाठी फार सोईचा असल्याने जास्तीत जास्त वाहने या रोडवरून ये जा करतात. त्यामुळे या रोडचे डाबरीकरणं व पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बाधकाम विभागाने गेल्या एका वर्षापूर्वी पूर्ण केले होते. याच रोडवरून रात्रीला अवैध रेतीची जड वाहतुक भरधाव वेगाने जातं येत असल्याने रोडवरील डाबरीकरणं उखडून रस्त्याची चाळणी होवून गेली आहे. त्याचं बरोबर ठेकेदारानें या रोडवरील सात ते आठ पुलाचे बाधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामूळे प्रत्येक पूल खचण्याच्या मार्गावर आल्याने रोडवरील गुंजाळा फाट्या लगत असलेल्या एका पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या पुलाला पडलेल्या भगदाडामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना आपला जीव मुठीत घालून वाहने चालवावी लागत आहेत.
अनेक अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका
त्यात काही वेळा नजर चुकीने अनेक अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची झालेली चाळणी आणि पुलावरील पडलेले भगदाडामूळे चालकांना वाहने चालवीतांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहने खिळखिळ होत असल्याने वाहने वेळोवेळी दुरुस्ती करावी लागत आहे याचा मोठा भुर्दड वाहन चालकांना सोसावा लागत आहे. परंतु त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गाची व पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.