आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
आखाडा बाळापूर/हिंगोली (Woman Dead body) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत दाती शिवारातील कालव्यातून बेपत्ता झालेल्या ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह गुरुवारी १९ मार्चला सकाळी कुर्तडी शिवारातील कालव्यात पाण्यावर तरंगतांना आढळून आला. आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. महिलेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील दाती येथील सुनंदा सुधाकर कदम (४२) ह्या दररोज दाती शिवारातील कालव्यावर धुणेधुण्यासाठी जातात. नेहमी प्रमाणे मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या
सुमारास त्या धुणे धुण्यासाठी कालव्यावर गेल्या होत्या. यावेळी धुणेधुत असतांना त्यांचा पाय घसरून त्या कालव्याच्या पाण्यात पडल्या. यावेळी कालव्याच्या पाण्याचा प्रवाहासोबत त्या वाहून गेल्या. त्यांनी आरडा ओरड करून मदत मागितली मात्र परिसरात कोणीही नसल्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही. दरम्यान, दुपारी दोन वाजल्यानंतरही सुनंदाबाई ह्या घरी आल्या नसल्याने त्यांच्या मुलांनी त्यांचा शोध सुर केला. (Woman Dead body) कालव्याच्या वर धुण्याचे टोपले दिसून आले मात्र सुनंदाबाई दिसल्या नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी कालव्याच्या पाण्यात त्यांचा शोध सुरु केला. मात्र दोन दिवसापासून त्यांचा शोध घेतला जात असतांनाही त्या सापडल्या नाही.
२० मार्च रोजी सकाळी एक मृतदेह कुर्तडी शिवारातील कालव्यात पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी (Woman Dead body) मृतदेह बाहेर काढला असता सदर मृतदेह सुनंदाबाई यांचा असल्याचे स्पष्ट झाले. (Woman Dead body) घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुड्डे, उपनिरीक्षक गणेश घोटके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख बाबर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृतदेहावर आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
मयत सुनंदाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या (Woman Dead body) प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सुधाकर भीमराव कदम यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबर हे करीत आहेत.