परभणी तालुक्यातील इंदेवाडी शिवारामधील घटना हरभरा काढणी दरम्यान अपघात…!
परभणी/दैठणा (Woman Death) : हरभरा काढणी दरम्यान मळणी यंत्रात पडल्याने शेतकरी कामगार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास परभणी तालुक्यातील इंदेवाडी शिवारात घडली. (Woman Death) मयत महिला दैठणा येथील रहिवाशी आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, शोभा गोविंद कच्छवे वय – ४५ वर्ष ही महिला गावातीलच एका शेतकर्याच्या इंदेवाडी शिवारातील शेतामध्ये हरभरा काढणीसाठी गेल्या होत्या. पीकाची काढणी संपल्यावर मळणी यंत्र बंद होत असतांना शोभा कच्छवे यांचा तोल जाऊन त्या यंत्रामध्ये पडल्या. डॉक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा (Woman Death) मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच दैठणा पोलीस ठाण्याचे सपोनि. अशोक जायभाये, सपोउपनि. बळीराम मुंढे, अमोल कच्छवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणीला पाठविला. या प्रकरणी दैठणा पोलीसात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. (Woman Death) मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.