मानोरा(Washim):- कारंजा तालुक्यातील खडी धामणी येथील २७ वर्षीय महिला मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने सौ. सपना अमोल मोरे पतीसह मोटर सायकलने दि. १४ जानेवारी गावाकडे जात असताना वाईगौळ जवळ अपघात घडल्याने तिचा जागीच मृत्यू (Death)झाला.
डोक्याला गंभीर दुखापतीमुळे मृत्यू
मृतक महिलेचे पती अमोल जनार्दन मोरे हे आपली दुचाकी क्रमांक एम एच – ३७ एस ९७४५ ने पत्नीला गाडीवर बसवून वाईगौळ येथे मकर संक्रांत निमित्त जात होते. वाईगौळ गावाजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मृतक महीला सौ. सपना मोरे हया दुचाकीवरुन खाली पडल्या. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्राव वाहत होता. तिला १०८ वाहनाने दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural hospitals) उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला मृत घोषीत केले.