Wani crime case :- वणीतील वेकोली मध्ये कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्यावर शारीरिक व मानसिक छळ(mental torture), शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच चाकूच्या धाकावर अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीवरून वेकोली कर्मचारी यांच्यावर वणी पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हा (Crime) दाखल केले आहे.
चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी…
फिर्यादी महिला कर्मचारी हिने दिलेल्या तक्रारीनुसार, गैरअर्जदार सुनील भाऊराव मोहितकर (५५), रा. जैन लेआउट, वणी यांनी छळ करण्याचा प्रयत्न केला. आरोपी सुनिल मोहितकर हे वेकोली कर्मचारी असुन शारीरिक व मानसिक छळ करून, जीवे मारण्याची धमकी व अपहरणाचा प्रयत्न केल्याचे आरोप फिर्यादीने केला आहे. आरोपीने भालर रोडवर तिच्या स्कूटरचा पाठलाग करुन त्याच्या काळ्या रंगाची हॅरियर कार क्रमांक एम एच २९ बी पी ६६८८ मध्ये तिला बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले आहे.
या गंभीर प्रकारच्या तक्रारीवरुन वणी पोलीस ठाण्यात आरोपी सुनील भाऊराव मोहितकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (ँर्ए) कलम ७४, ७५, ७८, ८७, २९६, ३५२, ३५१(२), ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सपोनी प्रियांका चौधरी करत आहेत. या घटनेमुळे वेकोली परिसरात आणि शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.




