तळोधी (Bramhapuri):- ब्रह्मपुरी वन विभाग (Forest Department) ब्रह्मपुरी अंतर्गत येणार्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील, देवपायली बीटा मधील नवानगर येथील महिला जनाबाई जनार्दन बागडे (५१) ही आपल्या शेतामध्ये धानाचे निंदन करायला गेली असता सायंकाळी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली.
सायंकाळी महिला घरी न आल्यामुळे परिवारातील लोकांनी शेतावर जाऊन शोधाशोध केली
मृतक जनाबाई बागडे ही महिला आपल्या शेतामध्ये धानाचे निंदन करायला गेली होती. मात्र सायंकाळी महिला घरी न आल्यामुळे परिवारातील लोकांनी शेतावर जाऊन शोधाशोध केली असता महिला सापडली नाही, त्याबाबत तात्काळ सूचना वन विभागाला देण्यात आली. तेव्हा रात्री जाऊन वनविभागाच्या टीमने शोधाशोध केली. मात्र पाऊस सुरू असल्यामुळे महिलेला शोधता आले नाही. सकाळी ५.०० वाजता पासून पुन्हा वन विभागाने गस्त सुरू केले असता निदर्शनास आले की, तिचे शेत हे कक्ष क्रमांक १३२ ला लागून रस्त्याच्या कडेला आहे, सायंकाळी शेताचे काम आटोपल्यानंतर महिला बाजूला शौचास बसली असता परिसरातील वाघाने अचानक मागून हल्ला करून कक्ष क्रमांक कक्ष क्रमांक १३२ मध्ये घटनास्थळापासून ८०० मीटर अंतरावर महिलेचे शव (Dead Body)निदर्शनास आले.
मृतकाचे परिवाराला २५ हजार रुपये तात्काळ मदत
त्यानंतर ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे शवविच्छेदन(Autopsy) करीता वन विभागाच्या गाडीने नेण्यात आले. यावेळी तळोदीचे वनपरिक्षेत्र अधिकारी(Forest Range Officer) यांनी मृतकाचे परिवाराला २५ हजार रुपये तात्काळ मदत दिली. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी त्याच परिसरात नागभीड वनपरिक्षेत्र मध्ये वाघाने असेच जंगलात असलेल्या एक शेतकरी दोडकु सेंदरे (६०) रा. मिंडाळा याला सुद्धा एक दिवसापूर्वी सायंकाळी ५.०० वाजता ठार केले होते. त्यामुळे या परिसरामध्ये वाघाचा वावर असल्यामुळे लोकांनी सायंकाळी जास्त उशिरापर्यंत एकट्याने जंगलात किंवा जंगलालगतच्या शेतामध्ये राहू नये व बिनाकामाने जंगलात जाऊ नये जेणेकरून कुणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही