या महिन्यात चोरीच्या प्रकरणात वाढ
परभणीतील मानवत रोड रेल्वे स्टेशनवरील घटना अनोळखीवर गुन्हा दाखल…!
परभणी (Manvat Train Crime) : मराठवाडा एक्सप्रेस मानवत रोड रेल्वे स्थानकातून सुटल्यावर खिडकीतून हात घालून अज्ञात चोरट्याने महिला प्रवाशाच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र लंपास केले. ही घटना २१ मार्चला रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.
शुभांगी साले यांनी तक्रार दिली आहे. सदर महिला ही आपल्या पतीसह छत्रपती संभाजीनगर ते नांदेड असा प्रवास (Manvat Train Crime) मराठवाडा एक्सप्रेसने करत होत्या. सदर रेल्वे मानवत रोड रेल्वे स्थानकावर आली. येथून गाडी सुटल्यावर अवघ्या दोन मिनिटात अज्ञात चोरट्याने रेल्वेच्या खिडकीतून हात घालत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. (Manvat Train Crime) चोरटा दागिने घेऊन पळून गेला. यानंतर महिलेने तक्रार दाखल केली आहे.
अंधाराचा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास
परभणी : शिर्डी साईनगर ही गाडी मिरखेल (Manvat Train Crime) रेल्वे स्थानकाजवळ आली असता गाडीचा वेग कमी झाला. अंधाराचा फायदा घेत अनोळखी चोरट्याने एका महिले जवळील ७८ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी २४ मार्चला रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती गंधम यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या शिर्डी साईनगर या गाडीने प्रवास करत होत्या. मिरखेल रेल्वे स्थानकाजवळ गाडीचा वेग कमी झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेत त्यांच्या जवळील दागिने हिसकावून पोबारा केला.