आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
हिंगोली (woman suicide) : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु. येथे एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या (woman suicide) केल्याची घटना रविवारी घडली. या संदर्भात आखाडा बाळापूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु.येथील मधुमती भारत गोरे (१७) या विद्यार्थीनीने ४ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरी कोणत्या तरी कारणावरून पत्राखालील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (woman suicide) केली. याप्रकरणी ५ ऑगस्टला आखाडा बाळापूर पोलिसात भारत गोरे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर.बी. गोणारकर हे करीत आहेत.