परभणी/सेलू (Woman suicide Case) : तालुक्यातील धनेगाव येथे एका २८ वर्षीय विवाहितेने मागील १२ वर्षापासून तिला असलेल्या आजारामुळे १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता धनेगाव शिवारात असलेल्या विलास सुखानंद कटारे यांच्या विहिरीत ऊडी मारल्याने मरण पावली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे, तालुक्यातील धनेगाव येथे विवाहिता सारिका प्रमोद जीवने (वय २८ वर्षे) हिने मागील १२ वर्षापासून तिला असलेल्या आजारास कंटाळून धनेगाव शेतशिवार परिसरात विलास सुखानंद कटारे या शेतकर्याच्या विहिरीत ऊडी मारल्यामुळे मरण पावली. (Woman suicide Case) घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. सखाराम प्रमोद जीवने याने दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वीच या विवाहितेचे वडील प्रमोद जीवने यांचा शेतात सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या (Woman suicide Case) आघातातून सावरण्यापूर्वीच पुन्हा ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत.