दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त हिरकणी अर्बनचे 100 कोटींचे तर २० शाखांचा विस्तार
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Adv. Vrishali Bondre) : चिखली -कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांच्या कुशल मार्गदर्शनात तथा सुसंस्कृत जडणघडणीतून तब्बल १३ वर्षापूर्वी हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे रुपांतर २० शाखांच्या विस्ताराने वटवृक्षात झाले आहे. तर सर्वसामान्यासह विशेषतः महिलाच्या दैनंदिन जीवनातील समस्यांच्या सोडवणुकीबरोबरच त्यांच्या जीवनाला आर्थिक उभारी देत महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य पार पडल्या जात आहे हीच हिरकणी महिला अर्बनच्या यशस्वी वाटचालीच्या कार्याची पावती आहे.
आर्थीक उलाढाल व अल्पबचतीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करीत महिलांचे जीवनस्तर उंचावण्याचे कार्य हिरकणीच्या माध्यमातून करत असल्याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन हिरकणी महिला अर्बन च्या अध्यक्षा ॲड. वृषालीताई बोंद्रे (Adv. Vrishali Bondre) यांनी संस्थेच्या १२ व्या आमसभेच्या प्रसंगी केले. या वेळी विशेष उपस्थितीत चिखलीच्या मा.आमदार रेखाताई खेडेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार श्री. राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अल्पावधीतच अग्रगण्य ठरलेल्या हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेची १२ वी सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी स्थानिक मौनीबाबा संस्थांच्या भव्य सभागृहात थाटात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. वृषालीताई बोंद्रे (Adv. Vrishali Bondre) ह्या होत्या तर कार्यक्रमाला मा.आमदार रेखाताई खेडेकर तथा मा.आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह मुंगसाजी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, खवीस चे अध्यक्ष ईश्वरराव इंगळे, दीपक खरात,प्रदीप हाके,हेमंत शिसोदिया, डॉ.संजय घुगे, माजी नगराध्यक्षा सौ.शोभाताई सवडतकर, सौ.प्रियाताई बोंद्रे आदींची उपस्थिती होती. या वेळी संस्थेच्या १२ वर्षीय यशस्वी वाटचालीची माहिती संचालिका कीर्ती शिसोदिया यांनी दिली तर वार्षिक अहवालाचे वाचन संस्थेचे मु.का.अ. संदीप भावसार यांनी केले.
महिलांना प्रवाहात आणणाऱ्या हिरकणीचे कार्य मोलाचे – मा.आ. रेखाताई खेडेकर
चूल आणि मुल यासह दैनंदिन जीवनातील गुरफटलेल्या समस्येतून महिलांना आर्थिक उभारी देत सामाजिक प्रवाहात आणण्याचे हिरकणी महिला अर्बनचे कार्य मोलाचे असल्याचे मत मा.आ.सौ.रेखाताई खेडेकर यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या स्त्री आणि पुरुष हे संसाररुपी रहाट गाड्याचे दोन चाकं व्यवस्थित चालली तर प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. हिरकणी च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती साठी शर्थीचे प्रयत्न होत असल्याने आज परीसारात अनेक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेतांना दिसून येत आहेत.
हिरकणी अर्बनची घोडदौड वाखान्याजोगी- मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे
महिलांनी महिलांसाठी अल्पबचतीच्या माध्यमातून बचतगटांची उभारणी करीत महिला व लघुव्यावसायिकांना आर्थिक उभारी देण्याचे कार्य परिसरात गत १२ वर्षाच्या अल्पावधीत हिरकणी महिला अर्बनने केले. कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांच्या संस्काररुपी आशीर्वादाच्या जडणघडणीतून महिलांचे जीवनमान उंचावण्याकरिता ॲड. वृषालीताई बोंद्रे ह्या सतत प्रयत्नशील असतात. आजमितीस हिरकणी पतसंस्थेच्या २० शाखांचा विस्तार झाला असून 100 कोटींहून अधिक रुपयाच्या ठेवी असणाऱ्या हिरकणीने या वर्षीचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त करून संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोविला आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महिलाच्या सक्षमीकरणासाठी हिरकणी महिला अर्बनची घोडदौड खरोखरच वाख्यान्याजोगी असून हिरकणी गाठत असलेल्या प्रगतीच्या शिखराचा गौरव मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे यांनी या वेळी केला.
आर्थिक उलाढालीत जोपासली सामाजिक बांधिलकी- दीपक देशमाने
व्यासपिठावरून बोलतांना श्री मुंगसाजी महाराज सह. पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देशमाने म्हणाले, जिल्हयाच्या सहकारात केवळ १३ वर्षाच्या वाटचालीत हिकरणी महिला अर्बन पतसंस्था ही सर्वाधिक सुविधा पुरविणारी पतसंस्था म्हणुन नावारूपास आली आहे. माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या पाउलावर पाउल टाकीत हिरकणी या पतसंस्थेच्या माध्यमातुन अॅड. वृषालीताई बोंद्रे समाज सेवेचे व्रत समर्थपणे पुढे नेत आहेत. आर्थीक संस्था चालवितांना सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे कार्य हिरकणीच्या विविध उपक्रमातुन निर्दशनास येत आहे. महिलांना आत्मनिर्भर व स्वालंबी करण्या बरोबरच सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार देवुन बेरोजगारी निर्मुलन, महिला, अबाल, वयोवृध्द, अपंग, रोग निदान शिबीरांच्या माध्यमातुन निरोगी समाज निर्मीतीचे कार्य हिरकणी करीत हिरकणी असल्याचे मत दीपक देशमाने यांनी व्यक्त केले.
यावेळी हिकरणी पतसंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव केला तर परिसरात घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेतील प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांसह, स्पर्धकांचा प्रोत्साहनपर पुरस्कार देवुन यथोचित सत्कार केला.यावेळी व्यासपिठावर संस्थेच्या अध्यक्षा अॅड. वृषालीताई बोंद्रे (Adv. Vrishali Bondre) यांच्यासह अतहासेद्यीन काझी, नंदकिशोर शिंदे, दिपक हाके, पंढरीनाथ टेकाळे, संगिताताई गाडेकर, अमडापुर सरपंच वैषालीताई गवई, जागृती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमाने, देशमुख ताई, संस्थेच्या उपाध्यक्ष त्रिवीणीताई हाके, संचालीका सौ. किर्तीताई शिसोदीया, संविताताई वाघमारे, सौ. विद्याताई देशमाने, अनिताताई घुगे, नेहाताई खरात, मालतीताई चवरे, सौ. गिताताई भोजवाणी, वंदनाताई इंगळे, मनिषाताई भुते, स्नेहाताई सावजी, श्रीमती प्रमिलाताई जाधव, शानुताई श्रीवास्तव, कौसर फातेमा बी ईरशाद खान, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप भावसार, अनुराधा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके, सरव्यस्थापक जे.बी. इंगळे, यांच्यासह जिल्हाभरात विस्तारीत असलेल्या हिरकणी संस्थेच्या २० शाखेचे संचालक, सल्लागार, शाखाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनीधी, भागधारकांसह महिलांची मोठया संख्येने उपस्थिीती होती. कार्याक्रमचे संचालन सौ.किरण वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेच्या वतीने करण्यात आले.