महिला सक्षमीकरण आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
बुलडाणा (Women Empowerment) : अमेरिकन फुलब्राईट स्कॉलर शिक्षिका एनी विल्यम्स व केला कारकोरन व आ. सौ.श्वेताताई महाले (Shweta Mahale) यांची विशेष उपस्थितीत बुलढाण्यातील फुलब्राईट स्कॉलरशिप शिक्षक आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त शिक्षणतज्ञ डॉ. शिवाजी देशमुख (Dr. Shivaji Deshmukh) यांची फुलब्राईट टीचर्स फॉर ग्लोबल क्लासरूम या उपक्रमासाठी निवड झाली व त्यांची शाळा (Zilla Parishad) जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बु. यांना अमेरिकन शिक्षिका एनी विलियम्स व केला कारकोरन यांचे यजमानपद प्राप्त झाले आहे.
स्मिताताई चेकेटकर यांच्याकडून बुलढाण्यात यशस्वी आयोजन !
अमेरिकेतील शिक्षणतज्ञ व सांस्कृतिक प्रातिनीधिक राजदूत असलेल्या या शिक्षिका सुमारे एक आठवडा (Zilla Parishad) जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बु. मध्ये अध्यापन व परिसराला भेटी देणार आहेत. तसेच युवकांशी व महिलांसोबत संवाद असे उपक्रमाचे नियोजन आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून बुलढाण्यातील महिला उद्योजिका व समाजसेविका स्मिताताई चेकेटकर यांनी दिनांक 6 जुलै 2024 रोजी बुलढाण्यात महिलांच्या आंतरराष्ट्रीय सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यशाळेला बुलढाण्यातील सुजाण महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे चिखली येथील आ. श्वेताताई महाले (Shweta Mahale) यांची कौन्सलेट तर्फे महिला सक्षमीकरण व कृषी अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिका येथे निवड झाली होती. त्यांचा अनुभव तसेच फुलब्राईट स्कॉलर शिक्षक म्हणून सुमारे सहा महिने अमेरिकेत वास्तव केलेले डॉ. शिवाजी देशमुख यांचे अनुभव व त्याला अमेरिकन फुलब्राईट स्कॉलर शिक्षिकांची असलेली दाद व श्रोत्यांचे विविध प्रश्न अशा पद्धतीचा चर्चात्मक स्वरूपाचा या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली.
“आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला सक्षमीकरण व समोरील आव्हाने !” हा विषय घेऊन सुरू झालेली चर्चा काहीप्रसंगी आंतरराष्ट्रीय बंधने तोडत महिलांना भावनिक करून गेली. पुरुषसत्ताक प्रवृत्ती, आई -मुलांचं नातं, कौटुंबिक सहकार्य अशा अनेक बाबतीमध्ये “सेलिंग इन द सेम बोट” अशी काहीशी परिस्थिती युएसए व भारतातील महिलांच्या बाबतीत या चर्चेतून बाहेर आली. बुलढाण्यात असा आगळावेगळा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
अशा पद्धतीचे आयोजन केल्याबद्दल आयोजक सौ. स्मिताताई चेकेटकर (Smitatai Checketkar) यांचे उपस्थितांनी आभार मानले. या कार्यक्रमाला चिखलीचे श्रीराम अर्बनचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, शिल्पा पवार, नगरसेविका सरलाताई मंदार बाहेकर, शुभांगी शिवाजी देशमुख आदित्य पाटील, गोपाल देवकर, प्रा. अमर चिंतळे यांची विशेष उपस्थिती होती.