भोयणी फाट्यावर रास्त रोको
मानोरा (Gorsena Andolan) : तालुक्यातील भोयणी या गावच्या महिला शेतकऱ्याच्या शेत शिवारात मानोरा- कारंजा रस्ता बांधकाम करताना चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्याने पुलातील पाणी शेतातील विहिरीत जाऊन शेतीचे व विहिरीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात (Gorsena Andolan) गोरसेनेच्या वतीने भोईनी फाटा येथे दि. ७ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुलाजवळ संरक्षण भिंत उभारण्याचे लेखी आश्वासन
भोयनी येथील महिला शेतकरी मिराबाई लचिराम राठोड यांचेकडे नाईनी शिवारात १ हे. ४२ आर शेतजमीन असून या शेतात विहीर खोदलेली आहे. सदरील (women farmer) महिलेच्या शेताला लागून मानोरा कारंजा रस्त्याचे रुंदीकरण इंद्रदीप कन्स्ट्रक्शन कं. मुंबई कडून करण्यात येऊन या रुंदीकरणादरम्यान उपरोक्त महिला शेतकऱ्याच्या शेताजवळून वाहत गेलेल्या ओढ्यावर कंत्राटदार कंपनीकडून सिमेंट काँक्रीटचे पुल बांधण्यात आले . या पुलाचे पाणी शेतात आणि शेतातील विहिरीत शिरून शेतीचे व विहिरीचा मोठा नुकसान झाल्याचे लेखी निवेदन गत दोन वर्षांपासून महसूल विभाग, सा. बां. विभाग आणि संबंधित कंत्राटदाराला सांगूनही कुठलीच उपाययोजना अद्याप पर्यंत करण्यात आले आले नाही.
लोकशाही मार्गाने विविध शासकीय कार्यालयाचे उंबरठे शिजवूनही महिला शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याच्या विरोधात घोषणा (Gorsena Andolan) गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रशासनाचे व कंत्राटदार कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपोषणकर्त्यांना सदरील शेतात होत असलेल्या नुकसानी संदर्भात अहवाल तयार करून शासनाकडून मंजुरी घेऊन संरक्षक भिंत उभारण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग याजकडून लेखी आश्वासन देऊन रास्ता रोको आंदोलन (Gorsena Andolan) सोडविण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार अस्टूरे आणि सा. बां. विभागाचे विवेक पवार उपस्थित होते. पोलीस विभागाने रास्ता रोको दरम्यान बंदोबस्त ठेवला होता.