आरोपी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल!
रिसोड (Women Harassment) : रिसोड शहरातील एका महिलेचा पहाटे 3 वाजताच्या सुमारात घरात घुसून जबरदस्तीने विनयभंग केल्याची घटना दिनांक 15 जुलै रोजी पहाटे 3 तीन वाजताच्या दरम्यान घडली. सुनील वर्धमान लोखंडे असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणी त्याच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करून पोलिसांनी (Police) त्यास अटक केली आहे. याबाबत पिडिताने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. 15 जुलै रोजी पहाटे 3 वाजताचे सुमारास सुनील वर्धमान लोखंडे आला व पिडिता घरामधील हॉलमध्ये झोपलेली असताना, घरात आला व वाईट उद्देशाने हात पकडुन पिडिते सोबत जोरजबरदस्ती करु लागला. पिडितेने त्याला लोटुन दिले व आरडा-ओरड केला. तेव्हा घरातील सदस्य उठले असता, सुनिल लोखंडे तेथुन पळुन गेला. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी कलम 74, 333 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव हे करीत आहेत.