दोन आरोपीचा विरुध्द गुन्हा दाखल
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (illegal sand tractors) : गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी तहसील स्तरावर पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकातील कोतवाल कर्मचारी अश्विनी दिगंबर आंधळे यांना गारवा हॉटेल जवळील चिचखेड रोडवर (illegal sand) अवैध रेती चोरी करूण घेवुन जातांना दोन ट्रॅक्टर अवैधरीत्या आढळून आले. अशी तक्रार नायब तहसीलदार सायली जाधव यांनी १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता पोलिस स्टेशनला दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपी विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अंढेरा पोलिस स्टेशनला *Andhera Police) नायब तहसीलदार सायली जाधव यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे की (illegal sand) गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी तहसील स्तरावर पथक स्थापन करण्यात आले आहे पथकातील कर्मचारी अश्विनी दिगंबर आंधळे कोतवाल यांची ड्युटी पॉईंट गारवा हॉटेल जवळील चिचखेड रोडवर लावण्यात आली होती .तेव्हा घटनास्थळी हजर असतांना त्यांना दोन लाल रंगाचे ट्रॅक्टरने अवैधरीत्या रेती चोरून नेत असल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्यांनी लगेच तहसीलदार यांना फोन करून सांगितले असता तात्काळ तहसीलदार यांच्या आदेशाने नायब तहसीलदार सायली हनुमंत जाधव यांना सदर घटनेची माहिती देऊन पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याचे सांगितले. त्यामुळे नायब तहसीलदार सायली जाधव यांनी (Andhera Police) अंढेरा पोस्टला येवून तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी आरोपी विशाल देशमुख , आकाश देशमुख दोघे राहणार मंडपगाव यांच्या विरुध्द कलम कलम 303(2),,3(5) बी.एन.एस. 2023,48 (7),48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सोनकांबळे हे करत आहेत.