कारंजा/ वाशिम (Women Sarpanch) : कारंजा पंचायत समिती (Karanja Panchayat Samiti) अंतर्गत असलेल्या लोहगाव येथील (Lohgaon Sarpanch) महिला सरपंचांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 5 जून रोजी पारित केलेल्या आदेशानुसार अपात्र ठरविले. या संदर्भात लोहगाव येथील सुनील राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सरपंच शारदा प्रकाश आडे यांनी लोहगाव व (Karanja Panchayat Samiti) कारंजा नगर परिषद अंतर्गत मौजे काळी कारंजा येथील प्रगती नगर मधील बुद्ध विहाराचे लगत अंकूश काळे लेआऊट मधील खुल्या जागेवर टिन शेडचे पक्के स्वरूपाचे बांधकाम केले असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
लोहगाव येथील सरपंच अपात्र
त्यावर सुनावणी घेत प्रकरणातील कागदपत्रे अर्जदार व गैरअर्जदार यांचे अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद तसेच जबाब आणि मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा यांनी सादर केलेल्या अहवालानुसार प्राप्त झालेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे (Gram Panchayat) कलम 16 ( 2 )नुसार सरपंच शारदा आडे यांना अपात्र ठरविण्यात आले. अर्जदार सुनील नरेंद्र राठोड यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे तर गैरअर्जदार सरपंच शारदा प्रकाश आडे यांना ग्रामपंचायत लोहगाव येथील (Lohgaon Sarpanch) सरपंच पदाकरिता अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी वाशीम यांनी 5 जून रोजी हा आदेश पारित केला. शारदा आडे या मागील सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आल्या आहेत.