भरती प्रक्रियेचा उद्या शेवटचा दिवस
हिंगोली (Home guard Bharti) : होमगार्डच्या ९६ रिक्त जांगासाठी १६ ऑगस्टपासून भरतीची प्रक्रिया सुरू आहे. गुरूवारी महिलांच्या भरतीची प्रक्रिया घेण्यात आली. आज २३ ऑगस्टला भरती प्रक्रियेचा अंतीम दिवस असून त्यानंतर कोणत्याही उमेदवारांना या प्रक्रियेसाठी संधी दिली जाणार नसल्याची माहिती (Home guard Bharti) होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी दिली.
हिंगोलीतील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर मागील आठवडाभरापासून होमगार्डच्या ९६ रिक्त पदांकरीता भरतीची प्रक्रिया घेतली जात आहे. या प्रक्रियेकरीता जवळपास ९४५५ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. ही (Home guard Bharti) भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याकरीता होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी स्वत: मैदानावर उपस्थित राहून बारकाईने लक्ष ठेवले. मागील काही दिवसापासून पुरूष होमगार्डच्या भरती प्रक्रिया घेतली जात होती. २२ ऑगस्ट रोजी महिलांची भरती प्रक्रिया घेण्यात आली. त्याकरीता ११३५ महिला व ५०० पुरूषांना सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार अनेक इच्छुक उमेदवार सकाळीच मैदानावर आले. ज्यामध्ये महिला व पुरूषापैकी ६४० उमेदवार मैदानावर उपस्थित होते. महिलांची भरती प्रक्रिया सुरू असताना प्रारंभी उपस्थित कर्मचार्यांनी कागदपत्र पडताळणी केली. त्यानंतर गोळाफेक, ८०० मीटर धावणे ही शारीरिक चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये अनेक महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी भरती प्रक्रिया राबविली जाते. नुकतीच होमगार्डची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये गुरूवारी महिलांची भरती (Home guard Bharti) प्रक्रिया घेण्यात आली.
या प्रक्रियेत कोणाचीही वशिलेबाजी न घेता भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली.
उद्या भरती प्रक्रियेचा अंतीम दिवस
१६ ऑगस्ट पासून भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामध्ये टप्याटप्याने प्रत्येक दिवशी दीड हजार उमेदवारांना बोलाविले जात होते; परंतु त्यात बरेच उमेदवार गैरहजर राहत होते. त्यामुळे त्यांना दुसर्या दिवशीच्या भरती प्रक्रियेत सामावून घेतले जात होते. २३ ऑगस्ट रोजी (Home guard Bharti) भरती प्रक्रियेचा शेवटचा दिवस असून त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला या भरती प्रक्रियेत संधी दिली जाणार नसल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक तथा समादेशक अर्चना पाटील यांनी दिली आहे.