परभणी (Parbhani) :- सराफा दुकानात आलेल्या दोन अनोळखी महिलांनी व्यवसायीकाची नजर चुकवुन ७० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले. ही घटना २१ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी २६ एप्रिलला नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
दिनेश कुलथे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे कोमटी गल्लीमध्ये सोन्याचे दुकान आहे. २१ एप्रिलला दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दोन अनोळखी महिला दुकानात आल्या. त्यांनी दुकानातील सोन्याच्या दागिन्याची पाहणी केली. यावेळी फिर्यादीची नजर चुकवुन १० ग्रॅम वजनाचे ७० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रार देण्यात आली आहे. तपास पोह. कुटे करत आहेत.