दोन दिवसात तीन वाहन पकडले…
वसमत (Illegal Secondary Minerals) : वसमत मध्ये अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी पकडले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी पथकाने पुन्हा एक वाळू घेऊन येणारे वाहन पकडले तीन दिवसात तीन वाहन पकडल्याने (Illegal Secondary Minerals) अवैध पद्धतीने गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वसमत शहरात मध्यरात्रीनंतर व सकाळी लवकर रेतीचे वाहन टिप्पर हायवा ट्रॅक्टर येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात (Illegal Secondary Minerals) अवैध उत्खनन करून ओली वाळू घेऊन वाहन येत आहेत.
या पार्श्वभूमीवर वसमत शहरात मंगळवारी भल्या पहाटे महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन वाहन पकडले होते. यात एका ट्रॅक्टर मध्ये ओल्या वाळूवर क्रेशरची चुरी टाकून वाहतूक व स्थान होत असताना महिला मंडळ अधिकारी प्रियंका खडसे व त्यांच्या पथकाने ट्रॅक्टर पकडले तर दगड भरलेला ट्रक क्रमांक एम एच 27 बी एक्स 68 98 हे वाहन होते.
बुधवारी सकाळी महिला मंडळ अधिकारी अधिकारी प्रियंका खडसे व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने नांदेड कडून वाळू घेऊन येणारा ट्रक क्रमांक एम एच 38 व्ही 4364 पकडला वाहन वसमत तहसील कार्यालयात आणून लावण्यात आले आहे. पुढील कारवाई तहसीलदार आणि संबंधित अधिकारी करणार आहेत कारवाई करणाऱ्या पथकामध्ये महिला मंडळअधिकारी प्रियंका खडसे, जिंतूरकर , ग्राम महसूल अधिकारी दळवी, ढगे, निर्मले यांच्यासह महिला कर्मचारी व पथकातील कर्मचारी सहभागी होते.




