उपनेत्या आशाताई विचारे यांची उपस्थिती
परभणी (Parbhani Shiv Sena) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संपर्क अभियानांतर्गत जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपनेत्या आशाताई विचारे यांनी आढावा घेतला. आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खंडोबा बाजारात (Shiv Sena) शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या वतीने महिलांना शिलाई मशीन वाटण्यासाठी फॉर्म देण्यात आले.
यावेळी (Shiv Sena) शिवसेना उपनेत्या आशाताई विचारे, जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, सुभाष सोळुंके, सुरेश जाधव, धम्मदीप रोडे, नितेश देशमुख, गीता सुर्यवंशी व महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.