महिला सक्षमीकरण करणे, हे शाश्वत विकासासाठी आवश्यक!
महिला दिन (Women’s Day) : गर्भातून मूल जन्माला घालण्यापासून ते म्हातारपणापर्यंत, ज्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छा आकांक्षांचे बलिदान द्यावे लागते, ती व्यक्ती म्हणजे स्त्री! पण तरीदेखील, उंच भरारी घेण्याची क्षमता ठेवते आणि समाजाच्या रुचकर टोमण्याला, ठोकर मारत सामोरे जाते, ती व्यक्ती म्हणजे स्त्री!
समाजात आपण बघतो, प्रत्येक क्षेत्रात स्त्री समोर आहे, परंतु कुठे तरी तिच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण होतात. अर्थात स्त्री सुरक्षित (Women’s Safety) आहे काय? हा प्रश्न आपल्यासमोर उदभवतो. जगासमोर रणरागिणी बनून, शत्रूशी लढण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये असते, परंतु ती कुठेतरी खचते आणि अत्याचाराला बळी जाते.
लक्ष्मीबाईच्या धैर्य आणि शौर्यासारखे लढे.!
याच अन्यायाला लात मारून पुढे जाण्यास समाजाने तिला मदतीचा हात देऊन, पुढे जाण्याचं प्रोत्साहन देणे हे देखील, पुरुषसत्ताक (Patriarchy) माणुसकीद्वारे, फार मोलाचे कार्य होईल. पौराणिक विचारधारेचा (Mythological Ideologies) मान ठेऊन, महिलेने सुद्धा तितक्याच, समजुतीने समाजात कार्य करावे. आधुनिकतेच्या भानगडीतून समाजाच्या नजरेत रुतणार नाही, असं चारित्र्याला साजेसं वर्तन करावं. लक्ष्मीबाईच्या (Lakshmibai) धैर्या आणि शौर्यासारखे लढे देत, आपल्या वाटचालीला न अडखळता, देशाच्या प्रगतीसाठी योगदान रुजू करून, येणाऱ्या पिढ्यांना ते मार्गदर्शन ठरेल असा ध्यास मनात ठेवत, सार्वभौम व प्रजासत्ताक देशाला घडवणे ही काळाची गरज भासत आहे.
समाजातील महिला आणि पुरुषांना समान संधी.!
आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो, या दिवसाकडे महिला सक्षमीकरण (Women Empowerment), आदर आणि महिलांच्या योगदानाशी जोडले जाते. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता (Gender Equality), पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण या न्याय आणि मानवी हक्कांच्या (Human Rights) बाबी आहेत. समाजातील महिला आणि पुरुषांना समान संधी, अधिकार आणि कर्तव्ये प्रदान करतात. महिला सक्षमीकरण करणे हे शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. सशक्त स्त्रिया (Strong Women) संपूर्ण कुटुंब आणि समुदायाच्या आरोग्य आणि उत्पादकतेमध्ये योगदान देतात आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संभावना सुधारतात.