पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन संपन्न
अमरावती (Women’s Kabaddi Tournament) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावतीच्या पटांगणावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ (Women’s Kabaddi Tournament) महिला कबड्डी स्पर्धेत यजमान अमरावती संघासह मुंबई, पुणे, नागपूर, आणि सातारा या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत स्पर्धेची पुढील फेरी गाठली आहे. या स्पर्धेसाठी पश्चिम विभागातील 72 संघांनी आणि जवळपास 1250 खेळाडू प्रशिक्षक आणि संघाचे व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी झाले आहे. खुल्या पटांगणावर चार कोर्टात या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासह सकाळी ठीक नऊ वाजता सुरू झाली.
यजमान संत गाडगेबाबा अमरावती संघाने भक्त कवी अरसिंग मेहता विद्यापीठ गुजरात संघाचा 49 विरुद्ध 17 असा 32 गुणांनी एकतर्फी पराभव केला. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच यजमान अमरावती संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच बढत मिळवली होती. अमरावतीच्या पायल श्रीनाथ, मंजुळा पवार, अक्षदा धानोरकर आणि वैष्णवी बोके यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने सरदार पटेल विद्यानगर गुजरात या संघाचा 53 विरुद्ध 14 असा 39 गुणांनी एकतर्फी पराभव केला. नागपूर संघातर्फे श्वेता रत्नपारखी, क्षितिजा सालचरकर आणि साक्षी त्रिवेदी यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले.
सर्वात रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात एसएनडीटी मुंबई विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाचा सुरक्षेच्या लढतीत 40 विरुद्ध 38 असा केवळ दोन गुणांनी पराभव केला. क्षणोक्षणी एक दुसऱ्या कडे झुकणाऱ्या या सामन्यात मुंबई संघाने शानदार विजयश्री खेचून आणली. मध्यंतरापर्यंत मुंबईचा संघ 28 विरुद्ध 10 असा 18 गुणांनी आघाडीवर होता. पण कोल्हापूर संघाने आपला खेळ उंचावत शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. पण हा संघ विजयी होऊ शकला नाही. विजय संघातर्फे स्वाती भोसले आणि धनश्री कदम यांनी उत्कृष्ट चढाई करत तर कशिश पाटील हिने उत्कृष्ट पकडीच्या भरोशावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पराभूत कोल्हापूर संघातर्फे अर्चना झोरे, श्रद्धा माळी आणि ऋतुजा अंभी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
त्यानंतर झालेल्या सामन्यात बालाजी विद्यापीठ पुणे संघाने बरकत तुला विद्यापीठ भोपाळ संघाचा 36 विरुद्ध 33 असा तीन गुणांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत बालाजी विद्यापीठ पुणे 19 विरुद्ध 17 असा केवळ दोन गुणांनी आघाडीवर होता. शेवटपर्यंत चिवट झुंज देत बालाजी विद्यापीठ पुणे संघाने विजयश्री खेचून आणली. विजय संघातर्फे हर्षदा इंदरे, तेजू सपकाळ आणि शुभदा खोत यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. (Women’s Kabaddi Tournament) यानंतरच्या सामन्यात कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठ संघाने सरनिम गुजरात विद्यापीठ देसर या संघाचा ४६ विरुद्ध १७ असा २९ गुणांनी एकतर्फी पराभव केला. प्रारंभ पासूनच सातारा संघाने या सामन्यात बडत मिळवली होती. आजच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्याचे निकाल हे खालील प्रमाणे आहे. कच्छ विद्यापीठ गुजरात मात कढी विद्यापीठ गांधीनगर ४४ विरुद्ध ८. भावनगर विद्यापीठ भावनगर मात महाराजा विद्यापीठ भरतपुर ३२ विरुद्ध २८.
अवधेश प्रताप सिंग विद्यापीठ रेवा मात डॉक्टर एच एस गौर विरन विद्यापीठ सागर ३९ विरुद्ध २१. नवरंगपुरा विद्यापीठ अहमदाबाद मात गुजरात टेक्नॉलॉजी विद्यापीठ अहमदाबाद ६२ विरुद्ध १२. राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर मात साबरमती विद्यापीठ अहमदाबाद १५ विरुद्ध १०. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मात एल एन आय पी विद्यापीठ गोल्हेर ४५ विरुद्ध २२. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद मात शिवाजी विद्यापीठ गोल्हर ४८ विरुद्ध १२. आजच्या या स्पर्धेत पंच म्हणून देवी कामदी, संजय खारोखार, सुधाकर कहाळकर, शुभांगी तुमसरे आणि शोभा सहारे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे तांत्रिक समिती सदस्य म्हणून पद्माकर देशमुख सतीश डफळे आणि सुभाष चव्हाण हे काम पाहत आहे.