उमेद महिला कर्मचारी जिल्हा संघटनेने प्रशासनाला दिले निवेदन
लातूर (Umeed employees Andolan) : कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी उमेद महिला कर्मचारी जिल्हा संघटनेने उद्या गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागा अंतर्गत राबविण्यात येत आलेल्या (Umeed employees Andolan) उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा, तालुका स्तरावरील कार्यरत कर्मचारी तसेच समुदाय संसाधन महिला यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संघटनेच्या वतीने शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.
उमेद अभियानातील (Umeed employees Andolan) सर्व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याची शासनाने दखल घ्यावी यासाठी राज्य संघटनेकडून गावस्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत आंदोलनाबाबत चा कृती कार्यक्रम ठरविण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून 3 ऑक्टोबर 2024 पासून लातूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी काम बंद करणार असलेबाबतचे निवेदन तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे, असे लातूर जिल्हा उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच या काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन काम बंद आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा संघटना अध्यक्षांनी केले आहे.