पुसद (Worker Uposhan) : तालुक्यातील निंबी येथील रहिवाशी बापूराव रामराव सवंगडे व इतर तीन जणांनी (Pusad Forest Office) पुसद वन विभागाच्या सामाजिक वनीकरण अंतर्गत रोजंदारीवर केलेल्या कामाच्या पगारीसाठी वनविभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर दि. 31 जुलैपासून उपोषण (Worker Uposhan) सुरू केले आहे.त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पुसद यांना पोस्टाद्वारे रखडलेल्या पगारी संदर्भात निवेदन देऊन 30 जुलै पर्यंत रखडलेली पगार व वनपाल लांडगे यांच्या कार्यकाळातील केलेल्या तक्रारींची तात्काळ चौकशी करून त्यांचे निलंबन करून झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम त्यांच्या पगारीतून वसूल करण्यात यावी.
गेल्या एक वर्षापासून पगारीसाठी संघर्ष करणाऱ्या कामगारांना न्याय द्यावा असे निवेदन दिले आहे. निवेदनात ते म्हणतात की,माहे फेब्रुवारी ते जून 2024 या दरम्यान कामावर असताना सुद्धा वनपाल लांडगे यांनी गैरहजर दाखवून पगार देण्या टाळटाळ केली आहे. तर इतर तीन रोजनदारी कर्मचारी रमाशंकर राम मनोहर शुक्ला, वामन महादू इंगोले विष्णू चव्हाण यांच्याही पगारी त्यांनी रोखून धरले आहेत. वनपाल लांडगे यांची त्यांच्या कार्यकाळातील सखोल चौकशी करून चौकशी अंतिदोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या संदर्भामध्ये संबंधित वनपाल लांडगे यांच्याशी या मजुरां संदर्भात चर्चा केली असता, ते म्हणतात की हे कामावर नव्हतेच त्यांना कामावर या असं सांगूनही ते कामावर आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना काम न करता पगार कशी मिळेल असा प्रश्न त्यांनी उभा केला होता, मात्र या विषयाशी सखोल चौकशी करून सत्य काय ते बघितले जाईल व दोषीवर कारवाई करण्यात येईल.
– आडे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पुसद.