तहसीलदार यांना निवेदन
डिएससी केल्या कार्यालयात जमा
परभणी/पाथरी (Talathi Andolan) : परभणी/पाथरी तलाठी संघाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या वेळोवेळी निवेदन करूनही पूर्ण करण्यात येत नसल्याने व त्यामुळे का कार्यालयीन कामकाज करण्यास अडचण होत असल्याचे कारण देत पाथरी तहसील अंतर्गत येणारे सर्व सज्जाचे तलाठी यांनी मंगळवार २८ जानेवारी पासुन कामबंद आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात सोमवारी तहसीलदार यांना निवेदन सादर करत डिएससी कार्यालयामध्ये जमा करण्यात आली आहे.
सोमवार २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ पाथरी शाखेच्या वतीने तहसीलदार शंकर हांदेशवार यांना मागण्या पूर्ण न झाल्यामुळे काम बंद आंदोलन करण्यात येत असल्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनामध्ये यामध्ये म्हटले आहे की, (Talathi Andolan) तलाठी आणि मंडळ अधिकारी कामकाज संबंधाने अनेक वेळा निवेदन सादर करण्यात आले.
४ जुलै २०२४ व २० जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनाचा यावेळी संदर्भ देत काम बंद आंदोलनाबाबत (Talathi Andolan) वरिष्ठांना अवगत करुनही मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे ना इला जास्त काम बंद आंदोलन पुकारण्यात येत असल्याचे म्हटले आहे आंदोलनाचा भाग म्हणून प प्रतिनिधिक स्वरूपात डीएससी कार्यालयात जमा केल्याचे ही नमूद केले आहे .एवढी मागण्या संदर्भात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तलाठी सज्जानिहाय कोतवाल नियुक्ती करून तहसील व उपविभागीय कार्यालय येथे कार्यरत असलेल्या सर्व कोतवालांना कार्यमुक्त करत मुळ तलाठी सज्जावर रुजु होण्याबाबत आदेश करा, शासन निर्णयाप्रमाणे तलाठी (Talathi Andolan) यांना कार्यालयीन खर्चाकरिता ओ .ई . व ओ.टी व १ हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे भाडे, कालबाह्य झालेले निकामी लॅपटॉप व प्रिंटर ऐवजी नवीन चांगल्या प्रतिचे क्षमतेचे लॅपटॉप व स्कॅनरसहित प्रिंटर मिळावे, शासन निर्णयानुसार नैसर्गिक अनुदान यादी करिता मंजुर असणारा o .२५ टक्के कार्यालयीन खर्च मिळावा , लोकसभा व विधानसभा निवडणुक २०२४ वेळीचे बुयनिहाय प्रति बुथ १ हजार ५०० रुपये प्रमाणे खर्चाची भरपाई मिळावी, गौणखनिज पथकाकरिता शासकीय वाहन व पोलीस संरक्षण मिळावे, मंडळ अधिकारी यांचे थकीत वेतन अदा करत पुढील वेतन नियमितपणे महिन्याच्या ५ तारखेपूर्वी अदा करावे , सन २०२३-२४ गुप्त अहवाल ची प्रत सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मिळावी. या आठ मुख्य मागण्या तलाठी संघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघ पाथरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत .