प्रा. प्रणव चेंडके यांचे मार्गदर्शन : मंडळाच्या दोन विद्यार्थीनींना प्रवेश
अमरावती (Prof. Pranav Chendake) : भारतीय पारंपारीक खेळांचा प्रचार आणि प्रसारातून विश्वस्तरावर प्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने जागतिक शिक्षण क्षेत्रामध्ये भारतीय पारंपरिक खेळांचा लाैकीक साधला आहे. प्रामुख्याने श्री हव्याप्र मंडळाचा (Russian University) रशियन इंटरनॅशनल ऑफ युनिर्व्हसिटी (साेची) साेबत झालेला शैक्षणिक करार आज पारंपारीक खेळ व विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याला नवी उंची देत आहे. भारतीय पारंपारीक खेळांद्वारे शिक्षण आणि विद्यार्थी व्यक्तीमत्व कसे साधले जावू शकते याकरीता रशियन विद्यापीठाने श्री हव्याप्र मंडळाला आमंत्रित करून भारतीय पारंपरिक खेळ संदर्भात तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. मंडळाचे आतंराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके (Prof. Pranav Chendake) यांनी रशियन जागतिक विद्यापीठ येथे श्री हव्याप्र मंडळाचे कार्य, वाटचाल, पारंपारीक व आधुनिक खेळांची विविधता व उपयाेगीता यावर अभ्यासपुर्ण, संशाेधनपर मार्गदर्शन केले.
युनेस्काे क्रीडा समितीचे सदस्य श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने उच्च शिक्षणामध्ये पारंपारीक खेळांचा समावेश करीत विद्यार्थ्यांचे सक्षम व्यक्तीमत्व साकारण्याचा लाैकीक साधला आहे. याच अनुषंगाने २०२२ मध्ये रशिया येथील जगप्रसिद्ध (Russian University) रशियन इंटरनॅशनल ऑफ युनिर्व्हसिटी द्वारे श्री हव्याप्र मंडळाशी शिक्षण व क्रीडा करार झालेला आहे. या करारानुसार मंडळातील विद्यार्थीनी युडाॅन (लद्दाख) ला २०२३ मध्ये रशियन इंटरनॅशनल विद्यापीठामध्ये शिष्यवृत्ती देत प्रवेश देण्यात आला हाेता. आता परत २०२४ करीता मंडळाच्या डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेनश महाविद्यालयाच्या देवयानी दिवसे (महाराष्ट्र) व बेनराॅई एल. खारसियांतीव (सिक्कीम) या दाेन विद्यार्थीनींना उच्च शिक्षणाकरीता प्रवेश देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, २०२३ मध्ये श्री हव्याप्र मंडळामध्ये आयाेजीत क्रीडा व सांस्कृतिक समाराेहामध्ये (Russian University) रशियन इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला हाेता. साेबत दरवेळी आभासी (व्हर्च्युअल) बैठकीद्वारे क्रीडा व शैक्षणिक विचारांची आदान प्रदान हाेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रशियन इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी (साेची) द्वारे तीन दिवसीय क्रीडा, शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये मंडळाचे आतंरराष्ट्रीय समन्वयक व रशियन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी प्रा. प्रणव चेंडके (Prof. Pranav Chendake) यांनी अभ्यासपुर्ण व संशाेधनपुर्ण भारतीय पारंपारीक खेळ, मंडळाचा वैभवशाली इतिहास, शिक्षण-क्रीडा क्षेत्रातील याेगदान, वाटचाल आणि क्रीडा विद्यापीठ बाबत अभ्यासपुर्ण माहिती सादर केली.
रशियन इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी (Russian University) येथे आयाेजीत तीन दिवसीय कार्यशाळेची दखल आज जागतिक शिक्षण क्षेत्रात घेतली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय पारंपारीक खेळ व श्री हव्याप्र मंडळाचे कार्य नव्याने जागतिक पटलावर आले असून याबाबत मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांतराव चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डाॅ. विकास काेळेश्वर, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त करीत प्रा. प्रणव चेंडके (Prof. Pranav Chendake) यांचे अभिनंदन करीत आहेत.
दोन देशांच्या मैत्रीला बळ : कुलगुरू डॉ. लेव बेलोउसव
रशियन इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी (सोची) (Russian University) व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये झालेला शैक्षणिक व क्रीडा करार दाेन्ही देशातील सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राला अधिक बळ देणारा आहे. दाेन्ही देशाचे (भारत-रशिया) मैत्रीपुर्ण संबंध आज भावनिक असून या कराराद्वारे शिक्षण, क्रीडा आणि संस्कृती ची देवाण-घेवाण हाेत सक्षम विद्यार्थी घडविण्यास मदत हाेत असल्याचा विश्वास रशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (सोची) चे कुलगुरू (रेक्टर) डॉ. लेव बेलोउसव यांनी व्यक्त करीत श्री हव्याप्र मंडळाशी झालेल्या शैक्षणिक-क्रीडा करार गौरवास्पद असल्याचे मत व्यक्त केले.