झाडे लावा, झाडे जगवा
फणिंद्रपूरा वेलफेअर फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम :
नागपुर (World Environment Day) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) नागपुर महानगर पालिका (NMC) लक्ष्मी नगर झोन क्र. १ च्या अंतर्गत नवनिर्माण नगर गार्डन, परसोडी येथे फणिंद्रपूरा वेलफेयर फाउंडेशन, नागपुर महानगरपालिका लक्ष्मी नगर झोन क्र. १, तथा सप्तमहर्षी बहुउद्देशीय संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहीमेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये (Tree Plantation) उपस्थित नागपुर महानगर पालिका लक्ष्मी नगर झोन क्र. १ चे झोनल अधिकारी रामभाऊ तिडके, स्वास्थ निरीक्षक ऋषिकेश इंगळे, स्वास्थ निरीक्षक राजपाल खोब्रागडे , फणिंद्रपूरा वेलफेयर फाउंडेशन चे अध्यक्ष निलेश साखरकर, व्यवस्थापकीय संचालक श्रेय जानी, संचालक लकी चौधरी व सप्तमहर्षी बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष अक्षय कडीखाये यांनी प्रमुख्याने उपास्थित राहुन वृक्षारोपण केले.
५०० झाडांची वृक्षारोपण मोहीम :
दिनांक ०५/०६/२०२४ ते १५/०६/२०२४ रोजी नागपुर महानगर पालिकेतील प्रत्येक झोन मध्ये १० दिवसांमध्ये उर्वरीत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येईल. फणिंद्रपूरा वेलफेयर फाउंडेशन व सप्तमहर्षी बहुउद्देशीय संस्था नागपुर यांच्या संयुक्त विदमाने ५०० झाडांचे वृक्षारोपण पूर्ण नागपुर मध्ये करण्याची मोहीम दिनांक १५/०६/२०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे.