पुसदमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
पुसद (World Tribal Day) : आज 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन (World Tribal Day) म्हणून साजरा केला जातो. जगामध्ये जंगलाचे संरक्षक म्हणून ओळखल्या जात असलेल्या आदिवासी बांधवांच्या गौरवा करिता जागतिक आदिवासी दिन हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुसदमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात आदिवासी बांधवांच्या विविध संघटनाच्या माध्यमातून व नागरिकांच्या आबालवृद्धांच्या सहभागातून मोठ्या उत्साहाने आदिवासी दिन साजरा केला.
यानिमित्त अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून भव्य मोटर सायकल रॅलीचे (Grand Motorcycle Rally) आयोजन करण्यात आले होते. तर येथील बिरसा मुंडा चौकात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर शामियाना उभारून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर भव्य मोटरसायकल रॅलीची सुरुवात कै. वसंतराव नाईक यांच्या स्मारका पासून करण्यात आली. श्रीरामपूर ग्रामपंचायतच्या मुख्यमार्गाने भव्य दिव्य अशी ही (Grand Motorcycle Rally) मिरवणूक डीजेच्या तालावर निघाली.
यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचा सहभाग होता तर महिला तरुण-तरुणी ही मोठ्या संख्येने या भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गे बिरसा मुंडा चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मारोती भस्मे यांनी केले. या (Grand Motorcycle Rally) भव्य रॅलीचे संचालन सुनील ढाले यांनी केले.
रॅलीमध्ये व कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लीगल सेलचे माजी अध्यक्ष एड. आशिष देशमुख, तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य, शिवसेना जिल्हा समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रंगराव काळे, भाजप नेत्या डॉ. आरती फुपाटे, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे, सुरेश सिडाम, स्वप्निल इंगळे, सचिन आत्राम, अशोक तडसे, नामदेव इंगळे, विश्वास भवरे, नाना बेले यांच्यासह आजी-माजी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते कर्मचारी, महिला कर्मचारी, तरुण-तरुणी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक उपजिल्हा नियंत्रण शाखेचे निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल वाहतूक शाखा यांनी रॅलीच्या वेळी योग्य वाहतूक नियंत्रण केलं, हे विशेष.