जागतिक जल दिन मोठ्या उत्साहात साजरा
बुलढाणा (World Water Day) : आज जागतिक जलदिन मोठ्या उत्साहात जिल्हाभर साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी, जल पूजन असे विविध उपक्रम राबवून पाण्याची जाणीव जागृती करण्यात आली.
विविध उपक्रमांनी केली पाण्याची जाणीजागृती
दिनांक 22 मार्च रोजी जागतिक जलदिन (World Water Day) जगभर मोठे उत्साहात साजरा केला जातो. दिवसें दिवस वाढणारे पाण्याचे दुर्लक्ष कमी व्हावे, लोकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, शुद्ध पिण्यायोग्य पाण्याचे महत्व लोकांना कळावे, पाऊस पाणी संकलन करावे, पाण्याचा अपव्य टाळावा, यासाठी आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती केली जाते. त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातही जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर, गाव स्तरावरही मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्यात आली. यासाठी (Jal Jeevan Mission) शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरींचे आयोजन करण्यात आले.
त्या माध्यमातून पाणी, स्वच्छता, आरोग्यच्या घोषणा देऊन जाणीव जागृती करण्यात आली. तसेच जिल्हा तालुका स्तरावरही पाण्याचे जलपूजन करून जल शपथ घेण्यात आली. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा कडून बुलढाणा जवळच असलेल्या येळगाव धरणावर जाऊन जलपूजन करण्यात आले आणि जल शपथ घेण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन प्रकल्प संचालक (World Water Day) जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) तथा कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बुलढाणा राहुल जाधव तसेच त्यांचे चमूने केले होते.