भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूची दुचाकीस्वार जोडप्याला धडक
मुंबई (Worli Hit And Run): मुंबईतील वरळी परिसरात भरधाव वेगात असलेल्या BMWने दुचाकीला धडक दिली. या (Hit and run case) अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी हे जोडपे ससून डॉकवरून मासे खरेदी करून घरी परतत असताना कोळीवाडा परिसरात एका BMW कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. प्रदीप नाखवा यांच्या पत्नी कावेरी नाखवा असे मृत महिलेचे नाव आहे. (BMW Accident) अपघात होताच कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
शिवसेना (शिंदे गट) नेत्याच्या मुलगा आरोपी
कोळीवाडा परिसरात हा अपघात झाला. शिवसेना नेते राजेश शाह (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शाह BMW चालवत होता. (Hit and run case) अपघात झाला त्यावेळी प्रदीप दुचाकी चालवत होता, तर पत्नी मागे बसली होती. दुचाकीला धडक दिल्याने त्यांनी बाईकवरून उडी मारली. मात्र अवजड सामान घेऊन जाणारी त्यांची पत्नी कावेरी नखवा ही उडी मारण्यात अपयशी ठरली आणि कारने त्यांना चिरडले. अपघातानंतर कावेरी नाखवा यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला. (Worli Hit And Run) वरळी पोलिसांनी कारचा मालक राजेश शहा याला ताब्यात घेतले असून ते पालघरमधील शिवसेना (शिंदे) (Shinde group) स्थानिक नेते आहेत. कार चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
#WATCH | Worli police recovered and confiscated the BMW car from the Bandra area of Mumbai. The police have registered a case against two people who were present in the car.
Worli police have detained Rajendra Singh Bidawat who was present inside the car and the father of the… https://t.co/8G1VVeL7tS pic.twitter.com/J8cET77LQE
— ANI (@ANI) July 7, 2024
अपघातानंतर पोलीसांचा तपास सुरु
वरळी पोलिसांनी मुंबईतील वांद्रे परिसरातून एक BMW कार जप्त केली आहे. (Worli Hit And Run) पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेश शहा आणि त्याचा चालक दोघेही पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताच्या वेळी कार कोण चालवत होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या (BMW Accident) दुःखद घटनेमुळे शहरी भागात रस्ते सुरक्षा आणि वेगाने वाहन चालवण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कठोर कारवाईचे आश्वासन
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) म्हणाले की, तो कोणत्या पक्षाचा आहे याने काही फरक पडत नाही. आरोपींना सोडले जाणार नाही. ही दुर्दैवी घटना आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत.