आलापल्ली येथील सावरकर चौकात अहेरी पोलीसांची मोठी कारवाई
अहेरी (Tobacco seized Case) : तालुक्यातील आलापल्ली येथील सावरकर चौक परिसरात आज २९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अहेरी पोलीसांनी मोठी कारवाई करत बंदी असलेला सुगंधित तंबाखू (Tobacco seized Case) आणि पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणावर साठा हस्तगत केला आहे. सदर प्रकरणात रूणाल झोरे (३३ ) रा. सावरकर चौक, आलापल्ली या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.
आरोपीने वनविभागाच्या पडीक घराचा वापर करून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जमा करून ठेवला होता. त्याच्या विरोधात भारतीय नवसंहितेच्या (ँर्ए) कलम १२३, २७४, २७६, २७७अंतर्गत (Tobacco seized Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाईत पोलिसांना ६,७३,२०० रुपये किमतीचा हुक्का तंबाखू- ‘मजा १०८’ ब्रँडचे ७२० डब्बे असलेल्या १८ चुंगळया, २ चुंगळयामध्ये असलेला १६,४०० रुपये किमतीचा ‘होल्ला’ हुक्का तंबाखू, १२,४०० रुपये किमतीचा ‘ईगल’ हुक्का तंबाखू, ५२,९२० रुपये किमतीचा ‘सिग्नेचर फीनेस्ट’ पान मसाला असा ७ लाख ५४,९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पो.ह.वा. वंदना डोनारकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार, सपोनि पटले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रूणाल झोरे याच्या मुस्कटदाबीसाठी पथक तैनात करण्यात आले असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. या (Tobacco seized Case) प्रकरणातील अजून कुठलीही टोळी कार्यरत आहे का, याचा तपास देखील सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.