पुसद (Wrestling Bronze Medal) : ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ फुलवाडी द्वारा संचलित स्व.आप्पासाहेब अत्रे विजाभज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा फुलवाडी च्या नैतिक संतोष पवार या कुस्तीपटूने राज्यस्तरावर 14 वर्षाखालील 41 वजनी गटात ब्राँझ पदक पटकावले. 20 ऑक्टोबर ला परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुस्ती पटूने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.व कुस्तीतील शाळेचा दबदबा कायम ठेवला.
नैतिक ने नाशिक, नागपूर येथील कुस्ती पटूना चित करत कांस्य पदक (Wrestling Bronze Medal) पटकावले. सदर स्पर्धा या क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, तथा परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मागच्या वर्षी शाळेची कुस्तीपटू कु संचिता रवींद्र राठोड हिने राज्यस्तरावर कांस्य पदक प्राप्त केले होते.
मागील पाच वर्षांपासून कुस्ती (Wrestling Bronze Medal) व विविध प्रकारच्या खेळात शाळेचे विध्यार्थी जिल्हास्तर, विभाग स्तर, राज्यस्तरावर आश्रम शाळेचे नेतृत्व करतात. विजयी कुस्तीपटूंचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चव्हाण, सचिव राजेंद्र चव्हाण,जय बजरंग बली व्यायाम शाळाचे अध्यक्ष विश्वास पहेलवान, मुख्याध्यापक गजानन कलिंदर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.कुस्ती पटूना शाळेतील क्रीडा शिक्षक ईशान चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. दरवर्षीच शाळेचे अनेक खेळाडू राज्यस्तरापर्यंत विविध खेळात मजल मारतात.